कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरात रुग्णसंख्येत वाढ होत असून, त्यासाठी १५ मेपर्यंत राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने सुरू ठेवण्यास मनाई आहे. या कालावधीतदेखील अन्य कोणतीही दुकाने सुरू ठेवल्यास दुकानमालकावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तरीही शाहू कॉर्नर येथील पाटुकले कापडाचे दुकान दुकान सकाळी ११ नंतरदेखील सुरू होते. तसेच दुकानामध्ये कोणाच्याही तोंडाला मास्क नव्हता. ग्राहकदेखील बारा वाजून गेले तरी खरेदी करीत होते. सोशल डिस्टन्सचे कोणतेही पालन नव्हते. त्यामुळे व्यापार करण्यासाठी वेळेचे बंधन घालून दिलेले असतानादेखील दुकान सुरू ठेवल्याने नगरपालिका प्रशासनाने या दुकानावर कारवाई केली. ही कारवाई खेमचंद लालबेग, तानाजी कांबळे, अमोल कांबळे, युवराज पाटील व जालंदर कोरे यांनी केली.
इचलकरंजीतील कापड दुकानावर पालिकेची दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 4:24 AM