शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
2
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
3
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
4
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
5
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
6
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
7
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
8
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
9
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
10
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
12
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
13
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
14
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
15
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
16
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
17
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
18
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
19
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
20
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."

kolhapur: पुरणपोळी खाल्ली; परंतु विजयाचा गोडवा चाखला नाही; आवाडे-माने मनोमिलनाचा अनुभव जुना 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 4:56 PM

फडणवीस यांना त्रास नको..

अतुल आंबीइचलकरंजी : पारंपरिक विरोधक असलेल्या माने-आवाडे यांच्यात समेट घडवत वरिष्ठांनी सूत जुळवले. पंधरा वर्षांपूर्वी २००९ च्या निवडणुकीत निवेदिता माने आणि आवाडे यांच्यात असाच समेट घडला होता. त्यावेळी दोघांनी पुरणपोळी खाऊन आम्ही एक झालो, असा संदेश जरूर दिला; परंतु प्रत्यक्षात त्या निवडणुकीत निवेदिता माने यांचा राजू शेट्टींकडून पराभव झाला. माने गटाला विजयाचा गोडवा चाखता आला नाही. या जुन्या आठवणींची इचलकरंजीकरांना मंगळवारी पुन्हा आठवण झाली. निमित्त होते प्रकाश आवाडे यांच्या निवडणुकीतील माघारीचे.गेल्या पाच वर्षांतील दोघांत झालेली धुसफूस पाहता यंदा प्रत्यक्षात मनोमिलन होणार का, याकडे आता मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. माने आणि आवाडे घराण्यात पारंपरिक राजकीय संघर्ष आहे. त्यात १५ वर्षांपूर्वी सन २००९ च्या लोकसभा निवडणुकीत निवेदिता माने यांच्याविरोधात राहुल आवाडे यांनी पहिल्यांदाच लोकसभा लढविण्याची घोषणा केली. त्यानिमित्ताने खासदारकीचा मतदारसंघ पिंजून काढत जुन्या गटांना सक्रिय करण्यास सुरुवात केली;परंतु त्यावेळी कल्लाप्पाण्णा आवाडे यांची काँग्रेसबद्दलची एकनिष्ठता असल्याने वरिष्ठांकडून आदेश आल्यानंतर राहुल यांना शांत करण्यात आले आणि माने-आवाडे या दोघांच्यात समेट घडविण्यात आला. त्यावेळी गुढीपाडव्यानिमित्ताने आवाडे यांच्या बंगल्यावर पुरणपोळीचे जेवण करून आम्ही एकत्र झालो असल्याचे जाहीर केले. निवेदिता माने यांचा प्रचार करणार असल्याचे सांगितले; परंतु प्रत्यक्षात तसे फारसे घडले नाही.

या निवडणुकीतही राहुल आवाडे यांनी लोकसभेची तयारी सुरू केली. सुरुवातीला भाजपकडून उमेदवारी मिळेल, या आशेवर जोरदार काम सुरू झाले; परंतु माने यांची उमेदवारी कायम राहिली आणि राहुल यांचा पत्ता कट झाला. त्यामुळे त्यांनी उमेदवारीसाठी उद्धवसेनेची चाचपणी केली. त्यातूनही काही होत नसल्याचे पाहून अखेर अपक्षाचा नारा दिला. या बंडाला धार यावी, यासाठी राहुल यांचे नाव बाजूला करत आमदार प्रकाश आवाडे यांचे नाव पुढे आणले आणि ताकद दाखवून दिली.

आवाडेंच्या उमेदवारीमुळे धैर्यशील यांना धोका निर्माण होणार, हे जाणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना फिल्डिंग लावली. दोन बैठका आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून फोन करून आवाडेंचे बंड थंड केले. त्यानंतर इचलकरंजी मतदारसंघात सर्व जुन्या चर्चांना नव्याने सुरुवात झाली. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत दोघांतील मनोमिलन खासदार माने यांना विजयापर्यंत कसे नेते, याकडे लक्ष लागले आहे.

फडणवीस यांना त्रास नको..आवाडेंच्या बंडखोरीमागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव येत असल्याने त्यांची अडचण होऊ नये, यासाठी माघार घेतल्याचे आवाडे गोटातून सांगण्यात आले.

संघर्ष कशामुळे?इचलकरंजीतील कृष्णा पाणीपुरवठा योजनेची पाच किलोमीटरची पाइपलाइन बदलणे, सहा जलकुंभांची उभारणी, शंभर कोटींचे रस्ते अशा कामांमध्ये माने यांच्याकडून अडवणूक केली जात असल्याचा आरोप आमदार आवाडे यांनी नाव न घेता केला होता. त्यातून दोघांतील संघर्ष वाढला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणPrakash Awadeप्रकाश आवाडेdhairyasheel maneधैर्यशील माने