शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
4
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
5
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
6
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
7
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
8
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
9
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
10
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
11
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
12
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
14
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
15
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
16
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
17
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
18
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
19
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
20
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर

दहा वर्षांनी कोल्हापूरला पुरुषोत्तम करंडक, कॉमर्स कॉलेज विजेता

By संदीप आडनाईक | Published: November 18, 2023 10:19 PM

चार एकांकिका महाअंतिम फेरीत : कोल्हापूर केंद्रातील प्राथमिक स्पर्धेचा निकाल जाहीर

कोल्हापूर : पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचे सांघिक विजेतेपद शनिवारी कोल्हापूरच्या देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सने सादर केलेल्या 'असणं नसणं' या एकांकिकेने पटकावले. तब्बल दहा वर्षांनी हा फिरता करंडक कोल्हापूरला मिळाला आहे.तीन दिवस येथील देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे नाट्यगृहात सुरु असलेल्या या स्पर्धेचा शनिवारी समारोप झाला. समीक्षक डॉ. अनमोल कोठडिया यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. यावेळी देवल क्लबचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, राजेंद्र पित्रे, उमा नामजोशी, डॉ. विनोद ठाकूरदेसाई, अनंत निघोजकर, राजन ठाकूर देसाई, शंकर उणेचा, परीक्षक चंद्रशेखर कुलकर्णी, प्रताप सोनाळे, मिलिंद दांडेकर उपस्थित होते.शनिवारी संगीत व नाट्यशास्त्र विभागाने 'कारण', साताराच्या महालक्ष्मी कॉलेज ऑफ फिजिआथेरपीने 'शो.शि.त.'(शोधला शिवाजी तर...), इस्लामपूरच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाने 'नाव' आणि भारती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाने 'हसण्यास कारण की' या एकांकिका सादर केल्या.

निकाल पुढीलप्रमाणे :अभिनय नैपुण्य : पियुष जामदार (कॉमर्स कॉलेज), वाचिक अभिनय : दृप्ता कुलकर्णी (तंत्रज्ञान अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ), अभिनेता : समर्थ तपकिरे (डीवाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय) : अभिनेत्री : सानिका बडवे (काॅमर्स कॉलेज), विद्यार्थी लेखक : भारतजीवन प्रभूखोत (निर्झर), दिग्दर्शक : अभिषेक हिरेमठस्वामी (असणं नसणं), उत्तेजनार्थ : धम्ममेघा कांबळे (इस्लामपूर), प्रकाश कोळी (इचलकरंजी), श्रेया दुधगांवकर, ऋतुराज कुलकर्णी आणि खदिजा मुल्ला (कोल्हापूर).

चार एकांकिका महाअंतिम फेरीत

सांघिक विजेत्या कॉमर्स कॉलेजसह प्रायोगिक एकांकिकेचे बक्षीस मिळणाऱ्या शहाजी लॉ कॉलेजची 'जंगल जंगल बटा चला है', देउरच्या प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालयाची द्वितिय क्रमांकाची 'पाहिजे म्हणजे पाहिजे' आणि तृतीय क्रमांकाची महावीर कॉलेजची 'निर्झर' एकांकिका पुण्यात २६ ते २९ डिसेंबरअखेर होणाऱ्या महाअंतिम फेरीसाठी कोल्हापूर केंद्रातून निवडली गेली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर