सातारा : बनघर (ता. सातारा) येथील दोघा मित्रांमध्ये क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून कोयत्याने वार करण्यात आले. डोळ्यांमध्ये चटणी टाकून हे वार करण्यात आले असून, यामध्ये सख्खे चुलत भाऊ जखमी झाले आहेत. मनोहर रघुनाथ जाधव (वय २८) व गणेश एकनाथ जाधव (३५, दोघे रा. बनघर) अशी त्यांची नावे आहेत.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मनोहर व गणेश हे दोघेही मुंबई येथे नोकरीला असून, ते घरगुती कार्यक्रमासाठी गावी आले आहेत. रविवारी (दि. ४) रात्री दहा वाजता हे दोघे बनघरच्या बसस्थानकात बसले होते.त्यावेळी गणेश सपकाळ हा तेथे आला व त्यांच्याशी चेष्टामस्करी करू लागला. त्यावेळी किरकोळ वादावादी झाली व गणेश सपकाळ याने शिवीगाळ करत ‘उद्या आम्ही तुमच्याकडे बघतोच,’ असे म्हणून तो तेथून निघून गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी (दि. ५) रात्री पावणेनऊच्या सुमारास मनोहर व गणेश घरामध्ये जेवण करत असताना गणेश व रमाकांत सपकाळ या दोघा भावांनी त्यांना बाहेर बोलावले. बाहेर येताच ‘काल काय झालं होतं,’ असे विचारत डोळ्यांमध्ये चटणी टाकून मनोहरच्या डोक्यात, हातावर व पाठीवर कोयत्याने वार केले. त्यावेळी मनोहर ओरडल्याने गणेश जाधव बाहेर आला. त्याने सोडविण्याचा प्रयत्न केला; परंतु गणेशच्याही हातावर त्यांनी वार केला.यावेळी घरातील लोक बाहेर आले. त्यावेळी त्यांनी दारात असलेल्या दांडक्यांनी रघुनाथ जाधव, एकनाथ जाधव, हौसाबाई जाधव या तिघांना दांडक्याने मारहाण केली. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. या घटनेची सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, अधिक तपास हवालदार पाटील करत आहेत. (प्रतिनिधी)मीच सांगितले मारायलासपकाळ बंधूंनी जाधव बंधूंना कोयत्याने वार करून त्यांच्या कुटुंबीयांना दांडक्याने मारहाण केली. या घटनेबद्दल गावातील काही व्यक्ती मधुकर सपकाळ यांना विचारण्यास गेल्या तेव्हा चक्क मुलांच्या वडिलांनीच ग्रामस्थांना ‘मीच सांगितले त्यांना मारायला,’ असे उत्तर दिले.
डोळ्यांत चटणी टाकून दोघांवर वार
By admin | Published: January 06, 2015 10:40 PM