शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचं 'मिशन महाराष्ट्र'! राज ठाकरे आज मराठवाड्यात; त्यानंतर नाशिक, पुणे दौरा करणार
2
राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा करताच हर्षवर्धन पाटलांचा जुना व्हिडिओ व्हायरल, काय म्हटलंय?
3
अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी
4
संतापजनक! "पप्पा वाचवा..." ओरडत पळाल्या मुली; शाळेतून परतताना तरुणांनी काढली छेड
5
Jio Financial ला SEBI नं दिली गूड न्यूज, आता शेअरवर नजर; काय परिणाम होणार?
6
Virat सह अनेक सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडीओ बनवून होतेय फसवणूक; बनावट गेमिंग अ‍ॅपद्वारे कोट्यवधींची लूट
7
'तुम्ही मनी लॉड्रिंग, मानवी तस्करीत...", वैज्ञानिकाला एक व्हिडीओ कॉल अन् गमावले ७१ लाख
8
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
9
IND vs NZ सामन्यात 'चिटिंग'? आर. अश्विननंही केली 'चॅटिंग', पण...
10
अमेठीत घडलं 'बदलापूर', आरोपी गंभीर जखमी! पोलिसाची रिव्हॉल्वर हिसकावताना घडली घटना
11
संपादकीय: अभिजात मराठी!
12
"दिवट्या आमदार..."; सुनील टिंगरेंवर शरद पवारांची टीका; अजितदादा म्हणाले, "बदनामीचा प्रयत्न..."
13
"शस्त्र सोडून गांधीवादी विचारानं काम करतोय..."; फुटिरतावादी यासीन मलिकचा कोर्टात दावा
14
शेवटच्या दिवशी अरबाजची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री; धावत येऊन निक्कीला उचललं, बेडरुममध्ये घेऊन गेला अन्...; सदस्यही पाहतच राहिले
15
Pan Cardबद्दल तुम्हाला किती माहितीये? पॅन क्रमांकाचा अर्थ काय? एकात असतं तुमचं आडनाव
16
"खाऊन पिऊन बिल उधार ठेवून आले"; दावोस दौऱ्यात CM शिंदेंची १.५८ कोटींची थकबाकी, कंपनीची नोटीस
17
Taro Card: देवीची कृपा मिळवून देणारा चैतन्यमयी आठवडा; वाचा तुमचे साप्ताहिक टॅरो भविष्य!
18
अजित पवारांच्या भायखळा NCP तालुकाध्यक्षाची हत्या; मुंबईत रात्री घडला थरार 
19
दररोज घसतोय Ola Electricचा शेअर; ₹१०० च्या खाली आला भाव; काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
20
‘त्या’ ९ मंत्र्यांना पक्षात पुन्हा प्रवेश मिळणार नाही; शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय : देशमुख

‘दर्जेदार’ रोपवाटिकेचे गाव तमदलगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 12:31 AM

संतोष बामणे ।लोकमत न्यूज नेटवर्कउदगाव : शिरोळ तालुक्यातील दुष्काळग्रस्त म्हणून तमदलगे गावची ओळख आहे. गावातील रोपवाटिकेच्या माध्यमातून दर्जेदार रोपे महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात यासह राज्यात पोहोचली आहेत. त्यामुळे तमदलगे रोपवाटिकेचे गाव म्हणून प्रसिद्ध झाले आहे. रोपवाटिकेमुळे युवकांना व्यवसाय उपलब्ध झाला असून, हजारो कामगारांना काम मिळाले आहे. त्यामुळे तमदलगेच्या रोपवाटिकेला ...

संतोष बामणे ।लोकमत न्यूज नेटवर्कउदगाव : शिरोळ तालुक्यातील दुष्काळग्रस्त म्हणून तमदलगे गावची ओळख आहे. गावातील रोपवाटिकेच्या माध्यमातून दर्जेदार रोपे महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात यासह राज्यात पोहोचली आहेत. त्यामुळे तमदलगे रोपवाटिकेचे गाव म्हणून प्रसिद्ध झाले आहे. रोपवाटिकेमुळे युवकांना व्यवसाय उपलब्ध झाला असून, हजारो कामगारांना काम मिळाले आहे. त्यामुळे तमदलगेच्या रोपवाटिकेला कार्पाेरेट लुक मिळाला आहे.सांगली- कोल्हापूर महामार्गावरील व शिरोळ-हातकणंगले तालुक्याच्या सीमेवरील असलेल्या छोट्याशा तमदलगे गावात हंगामी पाण्याची सोय उपलब्ध आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्याने बारमाही शेती या गावात पिकविता येत नाही. त्यामुळे देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या प्रयत्नाने गावच्या डोंगरालगत १९७२ साली पाझर तलाव बांधण्यात आला. त्यामुळे पावसाळ्यात तलाव भरले की विहीर, कूपनलिकांना पाण्याची सोय उपलब्ध झाली. गावात उदरनिर्वाह करण्यासाठी नोकरीशिवाय दुसरा कोणताच पर्याय उपलब्ध नव्हता. अशाच हंगामी शेतीमुळे अनेकजण जयसिंगपूर, हातकणंगले, इचलकरंजी येथे स्थायिक झाले, तर अनेकांनी शेतीला बगल देऊन रोपवाटिकेचा व्यवसाय जोपासला आहे.सन १९८८ मध्ये रोपवाटिकेचा उदय झाला. यावेळी तमदलगे गावात मोजक्या रोपवाटिका उभारल्या. त्यावेळी भाजीपाला व केळीच्या रोपाच्या रोपवाटिका होत्या. कालांतराने तमदलगेच्या रोपवाटिका बदलत गेल्या. यामध्ये भारताचे पहिले कृषिपंडित भीमगोंडा पाटील हे तमदलगे गावचे असल्याने त्यांच्या प्रेरणेतून महाराष्ट्र शासनाचा जिजामाता कृषिभूषण पुरस्कार वैजश्वर वझे यांना मिळाला. त्याबरोबर कृषिभूषण बाबूराव कचरे तर राजकुमार आठमुडे व शिवाजीराव कचरे यांना उद्यानपंडित पद मिळाले. तर कृषिमित्र रावसाहेब पुजारी यांच्यासारख्या शेतकºयांच्या प्रेरणेतून आज तमदलगे गावात तब्बल ६७ रोपवाटिका सज्ज आहेत.तमदलगे गावात सर्वाधिक उसाच्या रोपाच्या रोपवाटिका असून येथे ८६०३२, ०२६५, ८००५, १०००१, ६७१ या उसाच्या जातीची रोपे तयार केली जातात. ती महाराष्ट्राबरोबर मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात या राज्यात कोल्हापूरच्या तमदलगेची रोपे दर्जेदार आहेत म्हणून निर्यात केली जातात.उसाच्या आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच नवीन बियाणे, लागवड पद्धत, पाणी, खत नियोजन, आंतरमशागत, मजुरीत होत असलेली वाढ यासाठी दर्जेदार उसाची लागण महत्त्वाची आहे. उसाची रोपे लावण्याने उसाचे बियाणे कमी लागते. रोपवाटिकेत रोपे सात दिवसांपर्यंत उगवितात व ती २५ ते ३५ दिवसांत लागणीस तयार होतात. कारखाना नोंद एक महिना अगोदर करता येते. वाहतुकीस सोयीस्कर पट्टा पध्दत, एकरी योग्य रोपसंख्या ठेवता येते. उत्पादनात २० ते २५ टक्के वाट होते. यामध्ये चांगले आंतरपीकही घेता येते. त्यामुळे उसाच्या रोपांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.रोपवाटिकेसाठी सरासरी दहा महिन्यांच्या उसाची निवड केली जाते. सध्या ३०३३ ते ३५०० प्रतिटन लागणीसाठी उसाचा दर लागतो. दानोळी, उमळवाड, उदगाव, जांभळी, कोथळी, निमशिरगाव, मजले परिसरातून बियाणाचा ऊस आणला जातो. बियाणे तयार करताना प्रतिटनामध्ये ६५० ते ७०० किलो कांड्या निघत असून, बियाणे ३५० ते ३०० किलोपर्यंत मिळते. प्रथम बियाणे काढून प्लास्टिकच्या ट्रेमध्ये कोकोपीट भरून उसाचे बी लावले जातात. त्यानंतर आठ ते दहा दिवस त्याला एका प्लास्टिकच्या कागदाद्वारे झाकले जाते (भट्टी दिली जाते). ती रोपे बाहेर काढून त्याला दैनंदिनपणे सकाळ-संध्याकाळी पाणी दिले जाते. अशा पद्धतीने पूर्ण वाढ झाल्यावर ३० ते ३५ दिवसांत रोपे लागणीसाठी तयार होतात. यामध्ये ८६०३२, ०२६५, ८००५, १०००१, ६७१ आदी जातीच्या रोपांना प्रतिरोप सरासरी दोन रुपयेप्रमाणे विक्री केली जाते.सध्या अनेक शेतकरी रोपांची लागण करतात. त्यामुळे ऊस शेतीचे पूर्ण नियंत्रण करून जास्तीत जास्त नफा मिळविता येतो. वाढत्या मागणीनुसार तमदलगे परिसरात उसाच्या रोपांची दर्जेदार रोपे मिळतात. ऊसरोप वाटिकेबरोबरच तमदलगेत सर्व भाजीपाल्याची रोपवाटिकाही आहेत. यामध्ये दर्जेदार रोपे तयार होत असल्याने महाराष्ट्रासह राज्याबाहेर वाढती मागणी आहे. यामध्ये मिरची-सीता, सोनल, सितारा, सितारा गोल्ड. कलिंगड-शुगर क्रेन, कोबी-सुफिर्ती, सुनोफिक्टी, फ्लॅवर-पुजामा, फ्लार्क बाईट. टोमॅटो-रसिका, जेके, ८११, २१४८. वांगी-शिरगाव काटा, बिगर काटा, कार्णिका, हर्ष. झेंडू-कलकत्ता भगवा, अरोगोल्ड, गोल्सपट्टू, आॅथराप्ललो. शेवगा-उडशी. ढबू- इंदस, इंद्रा. कांदा-गारवा. गलाटा-पिवळा, लाल, अष्टर, भगवी, मखमल, लाल मखमल, निशिगंधा यासह विविध जातीच्या भाजीपाल्याची रोपे तमदलगे येथे मिळतात. सध्याच्या धावत्या युगात जलदगतीचे पीक घेण्यासाठी तमदलगेच्या शेतकºयांनी रोपवाटिकांची शेती स्वीकारली असून दर्जेदार रोपवाटिकेचे गाव अशीच तमदलगे गावाची ख्याती आहे.रोजगाराची संधीतमदलगे गावात एकूण ६७ रोपवाटिका असल्याने गावातील महिला व पुरुष कामगारांच्या हाताला काम मिळाले आहे. यामध्ये सरासरी १५०० ते १७०० जणांना काम मिळत असून महिलांना १८० तर पुरुषांना २५० रुपये दिवसागणिक पगार मिळतो. त्यामुळे तमदलगेसह निमशिरगाव, मजले परिसरातील कामगार कामासाठी येतात.