शहरं
Join us  
Trending Stories
1
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
2
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
3
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
4
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
5
माउलींनी संजीवन समाधी घेतली तेव्हा विठ्ठल रखुमाईलाही अश्रु अनावर झाले, तो आजचाच दिवस!
6
PPF ची जादू : ₹१.७४ कोटी व्याजातून कमावाल; मॅच्युरिटीवर मिळतील ₹२.२६ कोटी, पाहा सोपा फॉर्म्युला
7
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
8
खांदे पालट झाल्यावरही श्रेयस-अजिंक्य यांच्यात गोडी; पुणेकर ऋतुराज-राहुलवर भारी पडली मुंबईकर जोडी
9
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
10
बावीस वर्षांचे कोवळे वय, तरी इहलोकीचे अवतार कार्य संपवून माउलींनी परलोकीची धरली वाट!
11
"तिने याआधीही ४-५ वेळा...", जिया खान आत्महत्या प्रकरणावर सूरज पांचोलीच्या आईची प्रतिक्रिया
12
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
13
महाराष्ट्रात धक्कातंत्र? मुख्यमंत्री भाजपचाच होणार, पण नक्की कोणाला संधी?; पक्षातील ५ नावं स्पर्धेत
14
Cheetah Kuno: कुनोतून आली वाईट बातमी! चित्त्याच्या दोन पिलांचा मृत्यू, मृतदेहांवर जखमा 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
16
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
17
Stock Market Updates: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी; ऑटो शेअर्सवर दबाव
18
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये गृहमंत्री कोण असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे की....  
19
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
20
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ

पद्मा पथक उपांत्यपूर्व फेरीत

By admin | Published: April 21, 2017 12:25 AM

सतेज चषक हॉकी : इस्लामपूरच्या सुभद्रा डांगे, एस. डी. पाटील संघांचीही आगेकूच

कोल्हापूर : लाईन बझार येथे सुरू असलेल्या आमदार सतेज पाटील हॉकी स्पर्धेत तिसऱ्या दिवशी इस्लामपूरच्या सुभद्रा डांगे संघ, एस. डी. पाटील ट्रस्ट, पद्मा पथक संघाने प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत गुरुवारी उपांत्यपूर्व फेरी गाठली. लाईन बझार मैदानावर गुरुवारी सकाळी पहिला सामना झाला. यात इस्लामपूरच्या सुभद्रा डांगे संघाने मराठा वॉरियर्स संघाचा ४-२ असा पराभव केला. यात ‘सुभद्रा’कडून संतोष बिरजे व रोहित खोत यांनी अनुक्रमे ११ व्या व १७ व्या मिनिटास गोल करीत आपल्या संघास २-० अशी आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या २५ व्या मिनिटाला मराठा वॉरियर्सकडून प्रसाद नाईकने शॉर्ट कॉर्नरवर गोल करीत ही आघाडी २-१ ने कमी केली. सामन्याच्या उत्तरार्धात ‘सुभद्रा’कडून दिग्विजय कलशे याने ३० व्या व ३८ व्या मिनिटास गोल करीत ही आघाडी ४-१ अशी भक्कम केली. सामन्याच्या ४८ व्या मिनिटास मिळालेल्या पेनल्टी स्ट्रोकवर प्रसाद नाईकने गोल करीत सामन्यात ४-२ अशी आघाडी कमी केली. संपूर्ण वेळेत हीच गोलसंख्या राहिल्याने हा सामना सुभद्रा डांगे संघाने जिंकला. दुपारच्या सत्रात पहिल्या सामन्यात एस. डी. पाटील ट्रस्टने हॉकी लव्हर्स गु्रपचा २-१ असा पराभव केला. यात पाटील ट्रस्टकडून महेश घाटगे व अल्लाउद्दीन शेख यांनी गोल करीत २-० अशी आघाडी घेतली; तर लव्हर्स गु्रपकडून संग्राम पोकळे याने गोल नोंदवित ही आघाडी २-१ ने कमी केली. संपूर्ण वेळेत सामन्यात बरोबरी साधता न आल्याने पाटील ट्रस्टने हा सामना जिंकला. दुसरा सामना पद्मा पथक व वासू बेल्लारी (हुबळी) संघ यांच्यात होणार होता. मात्र, वासू बेल्लारी संघ वेळेत मैदानात उपस्थित न राहिल्याने पद्मा पथक संघास पुुढे चाल देण्यात आली. त्यामुळे तिन्ही विजेते संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले. लाईन बझार येथे सुरू असलेल्या आमदार सतेज पाटील हॉकी स्पर्धेत गुरुवारी सुभद्रा डांगे संघ व मराठा वॉरियर्स यांच्यात झालेल्या सामन्यातील एक क्षण.