झोपडपट्टी नियमितीकरणावरही चर्चा
जयसिंगपूर : जयसिंगपूरमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची जागा व झोपडपट्टीधारकांचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.
येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठीच्या जागेच्या प्रश्नासंदर्भात गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. पुतळ्याच्या जागेसंदर्भात शासनाने जागेपोटी जवळपास सव्वादोन कोटी रुपयांचा महसूल भरण्याचे आदेश दिले आहेत. ही जागा विनामोबदला मिळावी यासाठी पालिका सातत्याने पाठपुरावा करीत आहे. याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. मंत्री यड्रावकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल असे सांगितले. त्याचबरोबर झोपडपट्टीच्या जागेच्या प्रश्नाबाबत चर्चा झाली. झोपडपट्ट्यांचे नियमितीकरण करण्यासाठी सध्या शासनाच्या नावाने असलेल्या झोपडपट्ट्यांच्या जागा नगरपरिषदेच्या नावावर वर्ग केल्या जाव्यात, यासाठी पालिकेने पाठपुरावा केला आहे.
यावेळी उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, मुख्याधिकारी टीना गवळी, नगरसेवक संभाजी मोरे, शीतल गतारे, बजरंग खामकर, राहुल बंडगर, महेश कलकुटगी, माजी नगराध्यक्ष राजेंद्र नांद्रेकर, राजेंद्र आडके, अर्जुन देशमुख, आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो - ०७०१२०२१-जेएवाय-०५
फोटो ओळ - कोल्हापूर येथे आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या उपस्थित बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.