शहरात लाॅकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सकाळी दोन तास खरेदीसाठी गर्दी होत आहे. कोरोना प्रतिबंधक लस घेणाऱ्यांची संख्या आणि लसीकरण यंत्रणा यांचा ताळमेळ लागत नसल्याने ज्येष्ठ नागरिक अनेक तास प्रतीक्षेत बसल्याचे चित्र आहे. ग्रामीण रुग्णालयात यासाठी मंडपही उभारला आहे. ठरावीक संख्येत लसीकरण होत असल्याने आपला क्रमांक लागावा यासाठी धडपड सुरू आहे. नोंदणी वेळ नऊ ते दहा आहे. मात्र पहाटेच येऊन आपली नोंदणी करण्याचा आग्रह करीत आहेत.
फोटो
जिल्हा प्रवासबंदीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातून येणारी वाहने तपासण्यासाठी येथील नवीन सीमा तपासणी नाक्यावरून वाहतूक सुरू केली आहे. त्यासाठी महामार्गावर लोकंडी अडथळे उभारले आहेत.
२३ कागल ट्राफिक