कोल्हापूर : कोरोनाचा उद्रेक झाला असताना त्याच्यापासून बचावासाठी प्रतिबंधात्मक लस हाच आता एकमेव उपाय असल्याचे लक्षात येताच शहरातील लसीकरण केंद्रांवर नागरिकांच्या रांगाच्या रांगा लागत आहेत. बुधवारी सर्वच केंद्रांवर गर्दी झाली होती. दिवसभरात ४१९६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
शहरात बुधवारी सावित्रीबाई फुले येथे ४२०, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र फिरंगाई येथे ५३६, राजारामपुरी केंद्रावर ३५७, पंचगंगा केंद्रावर ५४९, कसबा बावडा येथे ६१, महाडिक माळ ६०, आयसोलेशन येथे ४०१, फुलेवाडी येथे ४२८,सदरबाजार येथे ३३, सिद्धार्थनगर येथे २२३, मोरे-माने नगर येथे ३७०, सीपीआर येथे २६८ तर खासगी रुग्णालयांत ४९० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
आतापर्यंत ९९ हजार ११३ नागरिकांना पहिला डोसचे तर १४ हजार ७१९ नागरिकांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे. ४५ वर्षावरील ४४ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.
- आज याठिकाणी मिळणार लस -
कोविड-१९ चा उपलब्ध लस साठा पाहता आज, गुरुवारी महानगरपालिकेच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले, राजारामपुरी, महाडिक माळ, सदर बाजार, आयसोलेशन, कसबा बावडा, फुलेवाडी, सिद्धार्थ नगर, मोरे-माने नगर, येथे कोविशिल्डचा पहिला व दुसरा डोसचे लसीकरण चालू राहणार आहे.
तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले, फिरंगाई, राजारामपुरी, कसबा बावडा, महाडिक माळ, आयसोलेशन, फुलेवाडी, सदर बाजार, सिद्धार्थनगर, मोरे-माने नगर येथे कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस चालू राहणार आहे. सीपीआर हॉस्पिटल येथे कोविशिल्डचा पहिला व दुसरा डोस तसेच कोव्हॅक्सिन दुसरा डोसचे लसीकरण चालू राहणार आहे.