शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
4
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
5
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
6
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
7
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
8
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
9
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
10
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
11
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
12
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
13
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
14
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
15
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
16
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
17
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
18
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
19
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
20
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

विधान परिषदेच्या मैदानात मताधिक्य किती हीच उत्सुकता

By admin | Published: December 30, 2015 1:06 AM

\सतेज यांचे पारडे जड : पाटील २२०, तर महाडिक १७० चा अंदाज, आज मतमोजणी

कोल्हापूर : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांचा विजय निश्चित मानला जात आहे. फक्त ते किती मतांनी विजयी होणार याचीच लोकांना उत्सुकता आहे. आज, बुधवारी सकाळी आठ वाजता येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मतमोजणी होत असून कोण निवडून येणार, या संबंधीच्या वृत्तपत्रांतील बातम्या वाचेपर्यंत विजयी उमेदवार गुलाल लावून मतमोजणी केंद्रातून बाहेर येणार आहे. पाटील व भाजपपुरस्कृत अपक्ष उमेदवार आमदार महादेवराव महाडिक यांच्यात ही लढत झाली आहे.या निवडणुकीत सतेज पाटील यांनी २५० मतांचा दावा केला आहे; कारण तेवढे मतदार त्यांनी सहलीवर नेले होते. त्यातील जास्तीत जास्त वीस मतांबद्दल त्यांनाही साशंकता आहे. आमदार महाडिक यांनी १६२ मतदार आपल्यासोबत असल्याचे जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात त्यांच्याकडे १३२ ते १४० पर्यंतच मतदार होते, असे त्यांच्याशी निकटवर्तीयांचेच म्हणणे आहे. त्यामुळे जरी फंदफितुरी झाली तरी ते १६० ते १७० मतांच्या पुढे जात नाहीत. त्यामुळे सतेज यांचा सुमारे ५० ते ६० मतांनी विजय होईल, असा अंदाज मतदानानंतर जाणकारांतून व्यक्त झाला. महाडिक निवडून यावेत यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्वत:ही अनेक नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते विनय कोरे यांना महाडिक यांना मतदान करण्याची गळ घातली; परंतु कोरे यांनी त्यास नकार देऊन सतेज पाटील यांना पाठिंबा दिला. खासदार राजू शेट्टी यांनाही मुख्यमंत्र्यांनी फोन करून महाडिक यांना पाठिंबा देण्यास भाग पाडले. सतेज पाटील यांचे वडील माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनीही या निवडणुकीत बरीच मोर्चेबांधणी केली होती. (प्रतिनिधी)अशी होणार मतमोजणी..मतपेट्या शासकीय तंत्रनिकेतनमधील माहिती व तंत्रज्ञान इमारतीच्या स्ट्राँगरूममध्ये बंदोबस्तात ठेवण्यात आल्या आहेत. आज, बुधवारी (दि. ३०) सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरुवात होईल. मतमोजणी तीन टेबलांवर होणार असून, प्रत्येक टेबलावर एक मतमोजणी पर्यवेक्षक आणि दोन मतमोजणी सहायक अशा एकूण नऊ व राखीव तीन अशा एकूण बाराजणांची नियुक्ती केली आहे. सर्व केंद्रांवरील मतपत्रिका एकत्रित केल्या जातील. त्या मिसळल्यानंतर त्याचे प्रत्येकी २५ चे गठ्ठे केले जातील. साधारणत: हे सोळा गठ्ठे होतील. तीन टेबल्सवर ते मोजायला दिले जातील. म्हणजे मतमोजणीच्या पाच फेऱ्या होतील; परंतु तरीही ही प्रक्रिया सकाळी अकरा वाजेपर्यंत पूर्ण होईल, असा निवडणूक यंत्रणेचा अंदाज आहे.प्रथमच एकमेकांशी झुंजविधानसभेच्या २००४ च्या निवडणुकीत करवीर मतदारसंघातून निवडून येण्यासाठी सतेज पाटील यांना आमदार महाडिक यांची मदत झाली. त्यानंतर वर्चस्वाच्या राजकारणातून त्यांच्या वाटा वेगळ््या झाल्या. महापालिकेच्या २००९ च्या निवडणुकीतही हा संघर्ष होता. पुढे सतेज पाटील गृहराज्यमंत्री झाल्यावर त्यांनी त्रास दिल्याचा राग महाडिक यांना जास्त आहे. त्याच रागातून त्यांनी विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत मुलगा अमल यांना मैदानात उतरविले. महाडिक गटाची ताकद आणि भाजपच्या लाटेमुळे सतेज यांचा पराभव झाला. पुढे गोकुळ व राजाराम कारखान्यांतही या दोन नेत्यांत लढत झाली; परंतु तिथे दोन्हीकडे महाडिक यांनी आपला दबदबा कायम राखला. हे दोघे नेते थेट एकमेकांविरोधात कधीच रिंगणात उतरले नव्हते. त्यामुळेही ही लढत लक्षवेधी ठरली. ३१ डिसेंबरचा जल्लोष आजच...यंदाचा ३१ डिसेंबर उद्या, गुरुवारी असला तरी विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांच्यादृष्टीने आज, बुधवारी निकाल लागल्यापासूनच ३१ डिसेंबरचा जल्लोष सुरू होणार आहे. अनेकांनी त्याची तयारीही केली आहे. काही उत्साही कार्यकर्त्यांनी तर अभिनंदनाचे डिजिटलही तयार केले आहेत. फटाके वाजायचे अवकाश, लगेच शहरभर हे फलक लागणार आहेत.