शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका"; अजित पवार ग्रामस्थांशी काय बोलले?
2
Maharashtra Election 2024: गुलाबराव विरुद्ध गुलाबराव; मंत्री बनवणाऱ्या 'या' मतदारसंघात चुरशीची लढत
3
“बंडखोरी केलेले लोक आमचेच, समजूत काढण्यात यश येईल”; देवेंद्र फडणवीसांना विश्वास
4
मराठा आंदोलकांच्या घोषणाबाजीने भाजपा उमेदवार मेघना बोर्डीकरांचा गावातून काढता पाय
5
आज मुहूर्त ट्रेडिंगवर खरेदी करा 'हे' 10 स्‍टॉक...तज्ज्ञांना दमदार परताव्याची आशा
6
चेन्नईनं १८ कोटी का मोजले? Ravindra Jadeja नं मुंबईच्या मैदानात दिलं उत्तर
7
शौर्य, धैर्य अन् प्रेमाचा संगीतमय नजराणा! दिवाळीच्या मुहुर्तावर 'संगीत मानापमान'चा टीझर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
8
Diwali Padwa 2024: दिवाळी पाडव्याला बायकोने नवर्‍याचे औक्षण करण्यामागे आहे एक लोभस कथा!
9
अबू आझमींच्या अडचणी वाढणार?; सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार; प्रकरण काय?
10
"इंपोर्टेड माल", अरविंद सावंत यांनी आक्षेपार्ह शब्द वापल्याचा शायना एनसींचा आरोप, सावंत म्हणाले...
11
अग्निकल्लोळ! देवघरातील दिव्यामुळे लागली भीषण आग; दिवाळीच्या दिवशी ३ जणांचा मृत्यू
12
५०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत BSNL चा प्लॅन; दीर्घ वैधतेसह मिळणार एक्स्ट्रा डेटा
13
शरद पवार गटाचे उमेदवार समरजित घाटगे अंतरवालीत; मनोज जरांगेंची घेतली भेट, २ तास चर्चा
14
IPL 2025 : स्टार्क, KL राहुल ते मॅक्सवेल! टॉप-१० खेळाडू ज्यांना संघांनी दाखवला बाहेरचा रस्ता
15
"हिरवे कंदिल लावले असते, तर..."; मनसेचा शिवसेना ठाकरे गटाला थेट सवाल
16
शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या प्रचारात; भाजपच्या बंडखोर महिला नेत्याचा मोठा दावा
17
दररोज 6 कोटी रुपयांची फसवणूक, 'डिजिटल अरेस्ट' घोटाळ्यात हराजो लोकांचे नुकसान
18
महायुतीत बंडखोरांचा ३६ चा आकडा, त्यापैकी १९ भाजपाचे; बंड शमले नाहीतर युती-आघाडीला ५० जागांवर फटका
19
Aishwarya Rai Birthday: इन्स्टावर १४.४ मिलियन फॉलोवर्स, पण 'त्या' एका व्यक्तीलाच फॉलो करते मिस वर्ल्ड, कोण आहे ती?
20
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!

रब्बीचा हंगाम अंतिम टप्प्यात; कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी ९६ टक्के पेरण्या; 'या' तालुक्यात पेरा घटला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 12:08 PM

राजाराम लोंढे कोल्हापूर : जिल्ह्यात रब्बीचा हंगाम अंतिम टप्प्यात असून, शाहूवाडी, हातकणंगले व कागल तालुक्यात रब्बीचा पेरा घटला आहे. ...

राजाराम लोंढेकोल्हापूर : जिल्ह्यात रब्बीचा हंगाम अंतिम टप्प्यात असून, शाहूवाडी, हातकणंगले व कागल तालुक्यात रब्बीचा पेरा घटला आहे. शाहूवाडी तालुक्यातील केवळ ६४ टक्केच पेरण्या झाल्या असून, कागल ९२ टक्के तर हातकणंगले व भुदरगड तालुक्यात ९४ टक्के पेरण्या झाल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत सरासरी पेर क्षेत्र वाढले असले, तरी अद्याप ९६ टक्केच पेरणी झालेली आहे.यंदा परतीच्या पावसाने रब्बी हंगामातील ऑक्टोबर महिना वाया गेला. खरिपाची काढणी लांबल्याने, रब्बीचा हंगामही पुढे गेला. त्यामुळे पेरण्यांना उशीर झाला. साधारणत: डिसेंबरअखेर रब्बीच्या पेरण्या होतात. आतापर्यंत २१ हजार २५९ हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत पेरणीचे प्रमाण कमी आहे. तालुकानिहाय सरासरी क्षेत्र पाहिले, तर शाहूवाडी, कागल, भुदरगड व हातकणंगले तालुक्यात पेरण्या कमी झाल्या.सूर्यफुलाची केवळ १२ हेक्टरवरच पेरणीएकीकडे गोडेतेलाच्या दरात वाढ होत असताना, सूर्यफुलाची लागवड कमी होत चालली आहे. सूर्यफुलाचे जिल्ह्यात १५७ हेक्टर क्षेत्र असताना, केवळ १२ हेक्टरवर फक्त शाहूवाडी तालुक्यात पेरणी झालेली आहे.

तालुकानिहाय रब्बीच्या पेरण्या, हेक्टरमध्ये तालुका             पेरणी            टक्केवारीशिरोळ             ८६१               १२४पन्हाळा            २,२५८           १०५राधानगरी         ४८५              १०६चंदगड             २५६              ११४गगनबावडा      २६१               १०८करवीर            १,८२५            १०२गडहिंग्लज       ४,७६०           १०१आजरा             १,३८१            १४१भुदरगड          २१२                ९४हातकणंगले     ५,७७५           ९४कागल             २,९७८            ९२शाहूवाडी         १,४८८            ६४

पीकनिहाय अशी झाली पेरणी, हेक्टरमध्येपीक           सर्वसाधारण क्षेत्र            प्रत्यक्ष पेरणीज्वारी         ११ हजार ७९३             ११ हजार ९३६गहू             १ हजार ७५६              १ हजार ४६९मका           २ हजार २२०              १ हजार ८८३हरभरा       ४ हजार ७४६              ४ हजार ७२३सूर्यफूल      १५७                           १२

टॅग्स :kolhapurकोल्हापूर