शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! IPS रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्राच्या DGP बनल्या, निवडणूक काळात काँग्रेसच्या तक्रारीवरून पदावरून हटवले होते
2
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
3
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
4
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
6
नागपुरात कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ, कोणती नावे शर्यतीत?
7
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
8
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
9
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
10
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!
11
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
12
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
13
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
14
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
16
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
18
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
19
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
20
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...

सुनावणीदरम्यान कडेकोट बंदोबस्त

By admin | Published: September 24, 2015 1:11 AM

अशिलांचे झाले हाल : वाहतूकही वळवली, न्यायालय, माहिती, क्रीडा, कामगार न्यायालय, विक्रीकर, आदी कार्यालयांचे काम ठप्प

कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित आरोपी समीर गायकवाड याला बुधवारी दुपारी सुनावणीसाठी कसबा बावडा येथील सेंट्रल बिल्डिंगमध्ये असलेल्या प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात आले. या दरम्यान दुपारी दोन ते साडेचार वाजेपर्यंत या परिसरात अघोषित बंदच होता. त्यामुळे इतर न्यायालयीन सुनावणीसाठी आलेल्या अशिलांनाही परिसरात थांबण्यास पोलिसांनी मज्जाव केला. याचबरोबर परिसरात असणारी इतर न्यायालये, माहिती कार्यालय, क्रीडा उपसंचालक कार्यालय, विक्रीकर कार्यालय, आदी ठिकाणचे कामकाज काही काळ खोळंबले. बुधवारी दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी पानसरे हत्या प्रकरणातील संशयित समीर गायकवाड याला सुनावणीसाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अपर्णा कुमार जैनापुरे यांच्यासमोर पोलिसांनी हजर केले. या दरम्यान सेंट्रल बिल्डिंगसमोरील बावड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक अन्यत्र वळविली होती; तर सेंट्रल बिल्डिंगच्या परिसरात इतर न्यायालयांत सुनावणीसाठी आलेले अशील आणि माहिती कार्यालय, क्रीडा उपसंचालक कार्यालय, विक्रीकर कार्यालय, आदी कार्यालयांत कामासाठी आलेल्या नागरिकांना पोलिसांनी आत येण्यास मज्जाव केला होता. या दरम्यान पोलिसांनी दोन्ही बाजूंचे बाहेरील प्रवेशद्वार बंद केले होते; तर परिसरात असणाऱ्यांना जबरदस्तीने बाहेर घालविले. याचबरोबर सेंट्रल बिल्डिंग व पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे या परिसरात कामासाठी आलेल्या नागरिकांना येण्यास मज्जाव करण्यात आला. न्यायालयात कामकाजासाठी आलेल्या वकिलांनाही ओळखपत्र असल्याशिवाय आत सोडले जात नव्हते. अशिलांनाही ‘चारच्या पुढे या’ असे पोलीस सांगत होते. त्यामुळे एकूणच हा परिसर तणावग्रस्त बनला होता. तपासावर समाधानीकोल्हापूर पोलिसांनी संशयित आरोपी समीर गायकवाड याच्याबद्दलचे पुरावे न्यायालयात सादर केले असून, सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, संशयिताच्या बाजूच्या वकिलांनी रुद्रगौडा पाटील आणि समीरचा काहीच संबंध नसल्याचा युक्तिवाद न्यायालयासमोर मांडला. त्यामुळे एवढ्या गंभीर खटल्यात न्यायालयाचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न संशयिताच्या वकिलांनी केला आहे. पोलिसांनी सात दिवसांची कोठडी मागितली असताना युक्तिवादामुळे ती तीन दिवसांची मिळाली. याबाबत पोलीस आणखी खोलवर तपास करून पुन्हा आपली बाजू मांडतील. त्यांच्या तपासावर आपण समाधानी आहोत. या संशयिताचा पानसरे यांच्यासह डॉ. दाभोलकर, डॉ. कलबुर्गी यांच्या खुनांत सहभाग असण्याची शक्यता आहे. - स्मिता सातपुते, पानसरे यांच्या कन्या१ तास २० मिनिटे चालले न्यायालयीन कामकाज संशयित समीर गायकवाडला दुपारी २ वाजून ५५ मिनिटांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर पोलिसांनी हजर केले. या हत्येसंदर्भातील न्यायालयीन कामकाज सुमारे ४ वाजून १५ मिनिटांपर्यंत सुरू होते. असे एकूण १ तास २० मिनिटे न्यायालयीन कामकाज चालले. त्यानंतर ४ वाजून २४ मिनिटांनी संशयिताला पोलिसांनी पुन्हा अधीक्षक कार्यालयाकडे नेले. त्यानंतर हा परिसर तणावमुक्त झाला. कॉम्रेड पानसरे हत्याप्रकरणाच्या सुनावणीदरम्यान काही दगाफटका होऊ नये म्हणून जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ३५ जणांचे पथक कसबा बावडा येथील सेंट्रल बिल्डिंगमध्ये तैनात केले होते. या दलाकडे अत्याधुनिक ‘एके-४७’ सारखी शस्त्रे होती. त्यांच्या बंदोबस्ताच्या पद्धतीमुळे परिसरात एक प्रकारे गंभीरता व तणाव होता. जिल्हा पोलीस दलाचे साध्या वेशातील व गणवेशातील किमान साडेचारशे पोलीस जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय व न्यायालय परिसरात तैनात केले होते. यामध्ये सहा पोलीस निरीक्षक, आठ सहायक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपअधीक्षक यांचा समावेश होता.पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या गच्चीवर सशस्त्र पोलीस संपूर्ण न्यायालयाच्या परिसरात दुर्बीण, कॅमेऱ्यासह टेहळणी करीत होता. एकूणच या परिसरात पोलीस व प्रसारमाध्यमे यांचीच काय ती गर्दी दिसत होती. वाहतूक अन्यत्र वळवलीदुपारी २ ते ४.३० वाजेपर्यंत ही सुनावणीची प्रक्रिया न्यायालयात सुरू असल्याने कसबा बावडा मार्गावरील पोलीस अधीक्षक कार्यालय ते लाईन बझार, कसबा बावडा या मार्गावरील वाहतूक अधीक्षक कार्यालयाच्या अलीकडे थांबविण्यात आली होती.ही वाहतूक अधीक्षक कार्यालय - अलंकार हॉल - धैर्यप्रसाद हॉल - दरबार हॉल - लाईन बझार -कसबा बावडा यामार्गे वळविली. हा मार्ग साडेचारनंतर खुला केला.विक्रीकर भवनाच्या दरवाजातून दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी एमएच ०९ एजी-४९६ या टाटा सुमो गोल्डमधून संशयित आरोपी समीर गायकवाड याला आणले. या गाडीमागे एमएच-०९-एजी-००२७ ही क्वालिस, तर पुढे एमएच ४३ एजी ०४६१ या बोलेरो जीपने पोलिसांनी ही गाडी संरक्षित केली होती. पोलिसांनी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती; कारण तपासी अधिकाऱ्यांना आणखी खोलवर तपास करायचा होता. मात्र, संशयितांच्या वकिलांच्या मोठ्या फौजेने गोेल-गोल फिरून युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयाचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे न्यायालयात ३२ जणांच्या वकिलांच्या फौजेविरोधात एकच वकील बाजू मांडत असल्याची परिस्थिती होती. - बन्सी सातपुते, पानसरे यांचे जावई समीरच्या वकिलांचा युक्तीवाद समीर गायकवाड हा सनातन संस्थेचा पूर्णवेळ कार्यकर्ता आहे. ईश्वरीय राज्य स्थापन करावयाचे आहे, हाच या सनातन संस्थेचा उद्देश आहे. समीर या संस्थेचा पूर्णवेळ प्रचारक आहे; पण समीरला कोल्हापूर पोलिसांनी फक्त संशयावरून अटक केली आहे.रुद्रगौडा पाटील याला मडगाव बॉम्बस्फोटात प्रसारमाध्यमांनीच समोर आणले आहे. तसेच कॉ. पानसरे हत्याप्रकरणी संशयित म्हणून समीर गायकवाड याच्याकडे तपास सुरू आहे. कॉ. पानसरे यांची हत्या झाली त्याच दिवशी समीर गायकवाड हा ठाण्यात असल्याचे त्याच्या कॉल डिटेल्सवरून पोलिसांना तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे समीरचा या हत्येप्रकरणी काहीही संबंध नाही, हे स्पष्टच दिसून येत आहे. मोबाईलवर त्याला मोठे दिखाऊपणाने बोलण्याची सवयच होती. त्या पद्धतीची त्याची मानसिकताच होती, याबाबतचा रिपोर्ट पोलिसांकडे आहे.समीर गायकवाड आणि रुद्रगौडा पाटील या दोघांचे गेल्या सात वर्षांपूर्वी मोबाईल दुरुस्तीचे व विक्रीचे भागीदारीत मिरज येथे दुकान होते. त्यानंतर झालेल्या मडगाव (गोवा) बॉम्बस्फोटात १२२ जणांचे जबाब झाले; पण त्यामध्ये कोठेही रुद्रगौैडा पाटील याचे नाव नाही; त्यामुळे समीर आणि रुद्रगौडा यांचा कॉ. पानसरे हत्येशी काहीही संबंध नाही. पोलिसांनी समीरच्या सांगलीतील घरावर छापा टाकून २३ मोबाईल जप्त करण्यात आले होते; पण पोलिसांनी तपासात फक्त दोनच मोबाईल घेतले आहेत. त्यांपैकी एक व्यक्ती कोल्हापुरातून बोलल्याचे दिसून येत आहे. पण तो कोण याचा उलगडा अद्याप झालेला नाही. त्या प्रकरणातही समीरचा सहभाग दिसत नाही. कॉ. गोविंद पानसरे आणि नरेंद्र दाभोलकर यांच्या कुटुंबीयांनी संशयिताबाबत कोणत्याही यंत्रणेवर दबाव टाकलेला नाही; पण या हत्यांचा आधार घेऊन काहीजण ‘सनातन संस्थेवर बंदी घाला,’ अशी ओरड करीत आहेत, ती योग्य नाही.नागोरी आणि खंडेलवाल यांना तपास यंत्रणेने बळीचा बकरा बनविले. त्याचप्रमाणे समीर गायकवाडलाही बळीचा बकरा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. समीर हा निर्दोष असल्याने त्याला कायदेशीर मदत मिळत नाही; त्यामुळे आम्ही उत्स्फूर्तपणे ३१ वकील त्याच्या मदतीला धावून आलो आहोत. सरकारी वकिलांचा युक्तीवाद समीर आणि त्याची मैत्रीण ज्योती कांबळे यांच्यात होणाऱ्या संभाषणावरून त्याचा पानसरे यांच्या हत्येत सहभाग असल्याचा उलगडा झाला आहे.पोलिसांच्या तपासात मडगाव बॉम्बस्फोटातील रुद्रगौडा पाटील याच्याशी ामीरचा संबंध असल्याचे उघड. अंजली ही समीरची बहीण असून, तिच्याशी झालेल्या संभाषणावरूनही त्याचा हत्येत सहभाग असल्याचा पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे.तपास करताना समीरच्या सांगलीतील घरावर टाकलेल्या छाप्यात पोलिसांच्या हाती मोबाईलची ३१ सीमकार्ड लागली. ती त्यांनी जप्त केली. या ३१ सीमकार्डांचा तपास करायचा आहे. त्यावरून त्याने कोणाशी, कधी व कशासाठी संपर्क साधला आहे, याबद्दल तपास करणे अद्याप बाकी आहे; त्यामुळे समीरच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात यावी.समीर हा पोलिसांना तपासकामात सहकार्य करीत नाही. समीरच्या चौकशीवेळी बचावपक्षाच्या वकिलांना उपस्थित राहण्याची मुभा असल्याने तपासकामांत अडथळे येत आहेत. समीरच्या आवाजाचे नमुने मुंबईतील फॉरेन्सिक लॅबला पाठविले आहेत. गुजरात लॅबचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. रुद्रगौडा पाटील आणि समीर गायकवाड गेल्या अनेक महिन्यांपासून संपर्कात असल्याचा तपास पथकाचा दावा आहे.