आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि.२२ : आर. के. नगर येथील दिपसेवक सोसायटीमधील फलॅटमध्ये स्वयंपाक घरातील गॅस सिलिंडरला गळती लागल्याने घबराट उडाली. महापालिका अग्निशामक दलाच्या जवाणांनी घटनास्थळी धाव घेत प्रसंगसावधान ओळखून सिलेंडरची गॅस गळती थांबवत टाकी सुखरुप बाहेर काढल्याने अनर्थ टळला. ही घटना शुक्रवारी रात्री घडली.
आरकेनगरमध्ये निलेश दिनकर वायदंडे यांचे घर आहे. शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास स्वयंपाक करीत असताना अचानक सिलेंडर टाकीतून गॅस गळती होवून दूर्गंधी सुटली. वायदंडे कुटूंबिय भितीने बाहेर आले. त्यांनी महापालिका अग्निशामक दलास वर्दी दिली. काही क्षणांत जवान रमजान पटेल, प्रभाकर खेबुडे, अभय कोळी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जिवाची पर्वा न करता घरामध्ये शिरून सिलेंडरची गळती थांबवत तो सुखरुप बाहेर आनला.
वायदंडे यांच्या आजूबाजूला अपार्टमेंट व घरे आहेत. गॅस सिलेंडरच्या टाकीचा स्फोट झाला असता, तर मोठी भीषण आग लागून जीवितहानी झाली असती.