शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

मागासवर्गीय समिती निवडीवरून राडा

By admin | Published: April 24, 2017 11:54 PM

इचलकरंजी नगरपालिका : सत्तारूढ-विरोधी सदस्यांत धक्काबुक्की; घोषणा-प्रतिघोषणा

इचलकरंजी : नगरपालिकेकडील मागासवर्गीय कल्याण विशेष समितीच्या सभापती निवडीवरून सोमवारी सत्तारूढ आघाडी व विरोधक यांच्यात जोरदार वाद होऊन सभा वादळी ठरली. नगराध्यक्ष अ‍ॅड. अलका स्वामी यांच्याकडून मागासवर्गीय समितीची सदस्यसंख्या घटविल्याबद्दल त्यांचा निषेध करण्यात आला. यावेळी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या विरोधातही निदर्शने झाली. घोषणा-प्रतिघोषणांनी नगरपालिकेचे वातावरण दणाणून गेले होते.नगरपालिकेकडील मागासवर्गीय कल्याण विशेष समितीमध्ये पाच सदस्य नियुक्त करण्याची असलेली परंपरा नगराध्यक्ष स्वामी यांनी मोडीत काढली. सत्तारूढ आघाडीचे वर्चस्व राहावे, यासाठी सदस्यसंख्या पाचऐवजी तीन केली. त्यामुळे नगरपालिकेतील विरोधी राष्ट्रीय कॉँग्रेस व राजर्षी शाहू आघाडीच्या नगरसेवक व त्यांच्या समर्थकांनी नगराध्यक्षांच्या दालनासमोर जोरदार निदर्शने करीत ठिय्या आंदोलन केले. यावेळी नगरपालिकेतील ‘कारभारी’ हटावच्या घोषणांबरोबर आमदार सुरेश हाळवणकर हायऽऽ हायऽऽ व नगराध्यक्षा हायऽऽ हायऽऽ अशा निषेधाच्या घोषणा दिल्या गेल्या. मात्र, नगराध्यक्षांच्या दालनात सभापती निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. विरोधकांच्या निदर्शनाला न जुमानता निवडीची प्रक्रिया झाल्यामुळे घोषणाबाजीला जोर चढला. यावेळी सत्तारूढ गटाचे नगरसेवक नगराध्यक्षांच्या दालनात जात असताना विरोधी नगरसेवकांनी त्यांना रोखून धरले. तेव्हा परस्परांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला. यात पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यामुळे गोंधळात आणखीनच भर पडली.दरम्यान, सभापती निवडीची प्रक्रिया नगराध्यक्षांच्या दालनात सुरू राहिली. या प्रक्रियेमध्ये समितीवर तीन सदस्य निवडून समितीच्या सभापतिपदी नगरसेविका संध्या बनसोडे यांची निवड जाहीर झाली. त्यानंतर विरोधी आघाडीचे आंदोलन संपुष्टात आले. सोमवारच्या आंदोलनामध्ये कॉँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील, शाहू आघाडीचे गटनेते मदन कारंडे, संजय कांबळे, उदयसिंह पाटील, अमरजित जाधव, सायली लायकर, दीपक सुर्वे, आदींनी सक्रिय सहभाग नोंदविला.सभेनंतर घडलेल्या प्रकाराविषयी बोलताना राजर्षी शाहू आघाडीचे पक्षप्रतोद विठ्ठल चोपडे व राष्ट्रीय कॉँग्रेसचे प्रमुख नगरसेवक शशांक बावचकर म्हणाले, पारदर्शी कारभार म्हणत नगराध्यक्षांनी सोयीचे राजकारण केले. त्यांनी सोमवारच्या राजकीय घडामोडींमध्ये मागासवर्गीयांवर अन्याय केला. सदस्य संख्या निश्चित करण्याचे अधिकार पालिकेच्या सर्वसाधारण सभेला असताना नगराध्यक्षांनी यामध्ये विरोधकांची फसवणूक केली. आजच्या समिती निवडीच्या प्रकरणात आमदार सुरेश हाळवणकर यांनी नगरपालिकेच्या कारभारात हस्तक्षेप केल्याचे स्पष्ट झाले आहे. सत्तारूढ आघाडी हिटलरशाहीप्रमाणे हुकूमशाही गाजवित आहे. मात्र, आम्ही हे खपवून घेणार नाही. (प्रतिनिधी)मागासवर्गीय समितीच्यासभापतिपदी संध्या बनसोडे 1नगरपालिकेच्या मागासवर्गीय कल्याण विशेष समितीच्या सभापतिपदी सोमवारी भाजपच्या संध्या बनसोडे यांची निवड झाली. निवडीच्या प्रक्रियेदरम्यान सभापती निवडीचा कार्यकाल पाच वर्षे राहणार असल्याचा प्रस्ताव संमत केला. 2निवडीवर विरोधकांनी बहिष्कार घातल्यामुळे हाही ठराव बिनविरोध मंजूर झाला. नगरसेविका शोभा कांबळे व नगरसेवक महेश कांबुरे हे समितीमधील अन्य सदस्य. आहेत. 3राजकीय संघर्षातून बनसोडे यांची सभापतिपदासाठी झालेली निवड लोकशाहीच्या चांगल्या पद्धतीने झाली असून, त्यांची कारकीर्दसुद्धा उत्तमरितीने पार पडेल, असे नगराध्यक्ष स्वामी यांनी सांगितले. यावेळी सत्तारूढ आघाडीच्या सभापतींसह नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होते.