शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

कोल्हापूर जिल्ह्यातील ३५ सावकार पोलिसांच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 12:01 AM

कोल्हापूर : पाच ते दहा टक्के व्याजाने सावकारकी करणाऱ्या ३५ जणांविरोधात पोलिसांत अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांची सखोल ...

कोल्हापूर : पाच ते दहा टक्के व्याजाने सावकारकी करणाऱ्या ३५ जणांविरोधात पोलिसांत अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांची सखोल चौकशी सुरू असून, काही सावकार ‘पैसे नकोत; पण गुन्हा दाखल करू नका,’ अशी विनंती करीत आहेत. जिल्ह्यातील गल्ली-बोळांत खासगी सावकारकी फोफावली आहे. सावकारांच्या मनमानी व्याजात गोरगरिबांची कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत.शहरासह ग्रामीण भागात बेकायदेशीर खासगी सावकारांचे मोठ्या प्रमाणात पेव फुटले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दर शनिवारी पोलीस ठाण्यात तक्रार दिनाचे आयोजित केल्याने जिल्ह्यातून ३५ सावकारांच्या विरोधात अर्ज दाखल झाले आहेत. ज्या-त्या पोलीस ठाण्यात अर्जांची कसून चौकशी सुरू आहे. महिन्याभरात दाखल झालेल्या अर्जांवरून सावकारकीचा फास संपूर्ण जिल्ह्याभोवती आवळत असल्याचे भयावह चित्र आहे. खासगी सावकारांकडून गरीब, गरजू लोकांना मुलीचे लग्न, शिक्षण, घरबांधणीसह अन्य कारणांसाठी हजारो रुपयांचे कर्ज दिले जात आहे. सुरुवातीस कर्ज परत करण्यासाठी तगादा लावला जात नाही; परंतु त्यानंतर त्यांना व्याजासह मुद्दल देण्यासाठी सतावून सोडले जाते.या सावकारांविरोधात पोलीस ठाण्यापर्यंत तक्रार देण्याचे धाडस कोणी करीत नाहीत. सावकारांच्या त्रासाला कंटाळून अनेकांनी आपले जीवनही संपविले आहे.राजकीय लोकप्रतिनिधी आणि शासकीय नोकरदार वर्ग सावकारकीमध्ये अग्रेसर आहे. पोलिसांकडून सुरू असलेल्या चौकशीने काही सावकारांच्या पायांखालची वाळू सरकली आहे. विक्रमनगर परिसरातील एका सावकाराने दहा टक्के व्याजाने पैसे देऊन कागल येथील तरुणाला वेठीस धरले आहे. त्याच्याही अर्जाची राजारामपुरी पोलिसांत चौकशी सुरू आहे.जादा व्याजदराने कर्जगरीब लोकांच्या मजबुरीचा फायदा घेत या सावकारांनी अनेकांची घरे, जमिनी व वाहने हडप केली आहेत. दरमहा १० ते २५ टक्के व्याजदराने ते कर्ज पुरवितात. त्यामुळे मूळ कर्जापेक्षा त्याचे व्याजच देताना कर्जदार पुन्हा कर्जाच्या खाईत सापडतो. ही वसुली करण्यासाठी सावकारांनी काही गुंड पोसले आहेत. त्यांच्याकडून कर्जदारांना वेळप्रसंगी दमदाटी व मारहाणही केली जाते.