शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

राधानगरी धरण भरले, दोन दरवाजे उघडले, ८२ बंधारे पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 12:32 PM

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने आज, सकाळी थोडीसी उसंत घेतली असली तरी राधानगरी धरण आज सकाळी ७ वाजता भरले.

ठळक मुद्देराधानगरी धरणामधून २८२८ क्यूसेकचा विसर्गस्वयंचलित दरवाजा क्र ३ ही उघडला

कोल्हापूर : संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागुन राहिलेले  राधानगरी धरण आज सकाळी साडे आकरा वाजता पुर्ण भरले. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने आज, सकाळी थोडीसी उसंत घेतली. राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडले आहेत. जिल्ह्यातील ८२ बंधारे पाण्याखाली गेले असून कोल्हापूर पन्हाळा मार्गावरील केर्ली येथे रस्त्यापर्यंत पाणी आले आहे. 

एकुण ५७६८ क्युसेक्स विसर्ग सुरु, ३४७.५ फुट पाणीपातळी झाल्यावर ६ नंबरचा स्वयंचलित दरवाजा सुरु झाला. त्यानतर पाऊण तासाने ३ नंबरचा दरवाजाही सुरु झाला. यातून प्रत्येकी एकहजार चारशेहे प्रमाणे दोनहजार आठशेहे व जलविद्युत निर्मिती केन्द्रातून एकहजार चारशे असा एकुण चारहजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु आहे. दुपारी १.१५ वाजता राधानगरी धरणाचा ५ नंबरचा दरवाजा उघडल्यामुळे  नदीला पुर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

६ नंबरचा स्वयंचलित दरवाजा सुरु झाला.

५७६८ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग होत असून नदीकाठच्या गावातील लोकांनी सतर्क रहावे, असा दक्षतेचा इशारा पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी यांनी दिला आहे. आज सकाळी ११-३० वाजता राधानगरी धरणाचा सहावा स्वयंचलित दरवाजा उघडून १४२८ क्यूसेक तर पायथा गृहातून १४०० असा एकूण २८२८ क्यूसेकचा विसर्ग सुरु झाला आहे.पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील इशारा पाणी पातळी पहाटे २-२0 वाजता ३९ फूट तर ८ वाजता ती ३९ फूट २ इंच इतकी नोंदवली आहे. पावसाचा जोर कायम असून काही तासातच राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणाचे तीन क्रमांकाचा स्वंयचलित दरवाजा उघडला आहे. यामुळे पंचगंगा नदीची धोका पातळी ४३ फूट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठी व सखल भागात राहणाऱ्या लोकांनी सतर्क रहावे, असा दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. जंगमहट्टी मध्यम प्रकल्पही काल सकाळी ८ वाजता पूर्ण क्षमतेने भरला आहे.गगनबावडा मुख्य रस्ता वाहतूकीस सुरुकोल्हापूर ते गगनबावडा मुख्य रस्ता वाहतुकीस सुरु करण्यात आलेला आहे. मांडुकली व मार्गेवाडी जवळ पाणी पूर्णपणे उतरले असून, लोंघे गावाजवळ फक्त दोन इंच पाणी रस्त्यावर आहे. लोंघे गावाजवळून फक्त एका वेळी एक वाहन सोडले जात आहे. राधानगरी धरणाचे इतर स्वयंचलित दरवाजे कधीही उघडण्याची शक्यता असल्यामुळे धरणाचे दरवाजे उघडले तर पुन्हा कोल्हापूर ते गगनबावडा मुख्य रस्त्यावर पाणी येण्याची शक्यता आहे.

आरळा शित्तूर राघुचावाडा रस्त्यावर पाणी

आरळा शित्तूर राघुचावाडा (तालुका शाहुवाडी) जिल्हा मार्ग-१ किमी १५/३५० रस्त्यावर पाणी आलेने वाहतुक बंद केली आहे.मात्र शित्तूर-तुरुकवाडी-मलकापुर-निळे-भेंडवडे-उदगिरी मार्गे पर्यायी वाहतूक सुरु आहे. 

टॅग्स :DamधरणRainपाऊसkolhapurकोल्हापूर