शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

कोल्हापूरकरांनो पाणी जपून वापरा; राधानगरी धरणात ६१, तर ‘काळम्मावाडी’त ५१ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2024 12:48 PM

गौरव सांगावकर राधानगरी : धरणांचा तालुका म्हणून राधानगरीची ओळख आहे. तालुक्यात असणाऱ्या तीन धरणांमुळे कोल्हापूर जिल्हा सुजलाम् सुफलाम् झाला. ...

गौरव सांगावकरराधानगरी : धरणांचा तालुका म्हणून राधानगरीची ओळख आहे. तालुक्यात असणाऱ्या तीन धरणांमुळेकोल्हापूर जिल्हा सुजलाम् सुफलाम् झाला. महाराष्ट्रातील अतिशय भक्कम जलाशय म्हणून राधानगरी धरण ओळखले जाते.राधानगरी धरणात सध्या ६१.०३ टक्के म्हणजे १३४.२५ दलघमी पाणीसाठा शिल्लक असून, गेल्यावर्षी याच दिवसांमध्ये धरणात १३६.४६ दलघमी (४.८२ टीएमसी) पाणीसाठा होता. यंदाही जवळपास ४.७४ टीएमसी साठा आहे. उन्हाळ्यामध्ये सलग पंधरा दिवस राधानगरी धरणातून ८०० ते १००० क्युसेक पाणी भोगावती नदी पात्रात सोडले जाते. हे धरण कोल्हापूर जिल्ह्यासाठी वरदान असून, शेतीसह पिण्याचे पाणीसुद्धा याच धरणातून वापरले जाते. आता कोल्हापूरला काळम्मावाडी धरणातून पाणी पोहोचणार आहे. तालुक्यातील असणारे तुळसी जलाशय धामोड खोऱ्यातील शेतीची तहान भागवते. यामुळे धामोड नदीकाठाची गावे आर्थिकदृष्ट्या सबळ झाली आहेत. तालुक्यातील धरणांमुळे आजवर पाणीबाणी जाणवली नसली तरी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच वाढत असलेल्या तापमानामुळे पाणीसाठा कमी होऊ शकतो.सध्या काळम्मावाडी (दूधगंगा) धरणात ५१.८३ टक्के तर तुळसी जलाशयात ६६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. शिल्लक असणारा पाणीसाठा तीन महिने जपून वापरावा लागणार आहे. अलीकडे वाढत असलेल्या तापमानामुळे राधानगरी तालुक्यात पावसाचे प्रमाण पूर्वीपेक्षा खूपच कमी झाले आहे. गतवर्षीप्रमाणे जर जून महिना कोरडा गेला तर पाणीटंचाई जाणवणार आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे.

धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. तरीही तीन महिने कडक उन्हाचे असल्याने पाणी जपून वापरावे लागेल. सध्या उपसाबंदी केली जात नाही, त्यामुळे शेतीला पाणीटंचाई भासणार नाही. -प्रवीण पारकर, उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे राधानगरी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरणWaterपाणी