- गौरव सांगावकर लोकमत न्युज नेटवर्कराधानगरी : कोल्हापूर जिल्हाचे लक्ष लागून राहिलेल्या राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा पहाटे झाला खुला झाला. एकूण सात दरवाज्या पैकी पहाटे 5:30 वाजता 6 नंबर चा दरवाजा खुला झाला . या स्वयंचलित दरवाज्यातून 1428 पाण्याचा विसर्ग भोगावती नदीत पात्रता चालू आहे.
राधानगरी धरणातून वीजनिर्मिती साठी सुरू असलेला 1600 अधिक स्वयंचलित दरवाजातून सुरू झालेला 1428 असा एकूण तीन हजार क्युसेस पाण्यात विसर्ग भोगावती नदीत सध्या सुरू झालेला आहे.धरणाची पाणी पातळी 347.40फूट इतकी आहे. पंचगंगा नदीची पाण्याची पातळी झपाट्याने वाढ होत आहे. पाटबंधारे विभागाच्या वतीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
गतवर्षीच्या तुलनेने यावर्षी मान्सून उशिरा दाखल झाल्याने राधानगरी धरण भरण्याला देखील उशीर झालेला आहे गेल्या वर्षी जुलै मध्ये धरण भरून स्वयंचलित दरवाजे खुले झाले होते मात्र यावर्षी ऑगस्ट महिना उजाडला आहे राधानगरी पाटबंधारे विभागाच्या योग्य पाणी व्यवस्थापनामुळे पावसाळा लांबलेला असताना देखील राधानगरी तालुक्यासह जिल्ह्याला राधानगरी धरणातून अतिशय व्यवस्थित पाणी पुरवठा करण्यात आला.