शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे आज असते, तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं असतं का?; धनंजय मुंडे म्हणाले...
2
माझी लाडकी बहीण योजना बंद होण्याची चर्चा; अदिती तटकरेंनी केला खुलासा 
3
Bhagyashree Navtake IPS: १२०० कोटींचा घोटाळा, सीबीआयचा गुन्हा; कोण आहेत भाग्यश्री नवटके?
4
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शिवसेनेत, जेलमधून परतताच पक्षप्रवेश
5
IND A vs Pak A : 'हायहोल्टेज' मॅच! युवा टीम इंडियानं दिला पाकिस्तान 'अ' संघाला दणका
6
Maharashtra Election 2024: नितीन गडकरींच्या घरी फडणवीस-बावनकुळेंचे 2 तास खलबते
7
IND vs PAK : कॅचेस विन मॅचेस! Ramandeep Singh च्या अफलातून कॅचनं फिरली मॅच (VIDEO)
8
Noel Tata: नोएल टाटांची पत्नी कोण? त्यांना कोणत्या गोष्टींची आहे आवड?
9
Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?
10
राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी; पुतणीने शरद पवारांना विचारला खरमरीत सवाल!
11
‘वंचित’कडून विधानसभेसाठी आणखी १६ उमेदवारांची घोषणा; साताऱ्यातील २ जागांचा समावेश!
12
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
13
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
15
Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा
16
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
17
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
18
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
19
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
20
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...

राधानगरी अभयारण्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 7:16 AM

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राधानगरी अभयारण्यासाठी लोगो निश्चित करण्याच्या उद्देशाने वन्यजीव विभागातर्फे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांत लोगो ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : राधानगरी अभयारण्यासाठी लोगो निश्चित करण्याच्या उद्देशाने वन्यजीव विभागातर्फे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांत लोगो स्पर्धा घेण्यात आली होती. राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त शाहू स्मारक भवन येेथे आयोजित या लोगोंच्या प्रदर्शनाचे उद‌्घाटन सोमवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते झाले.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक समाधान चव्हाण, विभागीय वनाधिकारी (वन्यजीव) विशाल माळी, सुनील करकरे उपस्थित होते. राधानगरी अभयारण्य पर्यटनाचे आवडते स्थान असून सुट्टीच्या दिवशी पर्यटकांचा मोठा ओढा असतो. राऊतवाडी धबधबा, राधानगरी धरण, बोरबेट पदभ्रमंती, दाजीपूर ट्रेक, दाजीपूर सफारी, देवराया ही सर्व स्थाने निसर्गवेड्या लोकांना आकर्षित करीत असतात. त्यामुळे अभयारण्यासाठी लोगो निश्चित करण्यात येत आहे. हे प्रदर्शन शुक्रवार (दि. २९) पर्यंत सुुरू असणार आहे. या स्पर्धेला शंभरहून अधिक निसर्गप्रेमींनी लोगो पाठविले. लोगोंमध्ये डिझायनिंगची कला उत्तमपणे वापरत जंगल वन्यजीव-गवा, शेकरू, फुलपाखरू तसेच राजर्षी शाहू महाराजांवर अनेक अप्रतिम लोगो पाठविले आहेत. तरी नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे.

---

फोटो नं. २५०१२०२१-कोल-राधानगरी लोगो

ओळ : कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनात आयोजित राधानगरी अभयारण्याच्या लोगो प्रदर्शनाचे उद‌्घाटन सोमवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते झाले.

.............................