दादा जनवाडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनिपाणी : कॉग्रेस पक्ष सत्य, न्याय, प्रेम आणि बंधुभाव यासाठी ही निवडणूक लढवत आहे तर असत्य, अन्याय, विद्वेश आणि खोटेपणा हेच भाजपचे धोरण आहे. त्यामुळे सत्य व न्याय हवा की विद्वेश , खोटेपणा हे ठरवून मतदान करा असे आवाहन कॉँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी शुक्रवारी केले. पंतप्रधान मोदी हे अनिल अंबानीचे चौकीदार आहेत. कॉँग्रेस सत्तेवर आल्यास राफेल सौद्यात देण्यात आलेले हजारो कोटी अनिल अंबानी यांच्याकडून काढून घेवून शेतकरी व गरीब लोकांना देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले.चिक्कोडी येथे कॉँग्रेसचे उमेदवार प्रकाश हुक्केरी यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, वनमंत्री सतीश जारकीहोळी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडुराव, माजी मंत्री कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार श्रीमंत पाटील, आमदार महांतेश कौजलगी, आमदार अंजली निंबाळकर, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार गणेश हुक्केरी, यशोमती ठाकूर, माजी वीरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील, रावसाहेब पाटील यांच्यासह उमेदवार व काँग्रेसचे नेते उपस्थित होते.राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा असे सांगितले तर ते याला तयार होत नाहीत; पण अनेक उद्योगपतींची कर्ज त्यांनी माफ केली आहेत. आज ते कृषी क्षेत्रावर व शेतकऱ्यांवर बोलत असले तरी आमच्याच पक्षाच्या कर्नाटक सरकारने शेतकºयांना ४० हजार कोटींची कर्जमाफी दिली. आमच्याच कर्नाटकातील सरकारने उसाला चांगला दर मिळवून दिला. देशातील जनतेला पंधरा लाख देऊ असे सांगून मोदींनी फसवणूक केली; पण काँग्रेसचे सरकार येताच देशातील ५ कोटी महिलांच्या खात्यावर प्रतिवर्षी ७२ हजार रुपये जमा करणार आहे आणि ही केवळ घोषणा नसून हे सत्यात उतरणार आहे. कारण हा निर्णय आम्ही अभ्यास करून घेतला आहे.मोदी सरकारने जीएसटी व नोटाबंदी केल्याने अनेक रोजगार गेले आहेत. प्रत्येक २४ तासात देशात २७ हजार रोजगार जात असून यामुळे बेरोजगारी वाढत आहे. मोदी सरकारने २२ लाख सरकारी जागा भरल्या नसून त्या काँग्रेस सरकार आल्यावर भरल्या जाणार आहेत. नवीन व्यवसाय सुरू करणाºया युवकांना अनेक नियम शिथिल करणार आहे. जे लोक दुसºयाला रोजगार देतील त्यांना मदत करण्याची भूमिका येणारे काँग्रेस सरकार घेणार आहे.कृषीचं वेगळं बजेटकृषी क्षेत्राबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले, साधारणत: वर्षातून एकच बजेट केंद्र सरकार मांडत असे, पण आमचं सरकार आल्यास कृषीसाठी वेगळं बजेट असेल. यामध्ये शेतकºयांना अधिकचे उत्पन्न व आर्थिक मदत यावर निर्णय होतील.... मोदींनी वेगळीच संस्कृती दाखवलीराहुल गांधी म्हणाले, मोदी हे नेहमी धर्म व संस्कृती बदल बोलत असतात. आपल्या संस्कृतीत गुरुला खूप महत्त्व आहे; पण मोदींनी आपले गुरू लालकृष्ण अडवाणी यांनाच उमेदवारी नाकारून वेगळीच संस्कृती दाखवली आहे.
राफेलमध्ये गेलेले हजारो कोटी अंबानीकडून काढून घेऊन शेतकरी, गरिबांना देऊ : राहुल गांधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:10 AM