आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. 0८ : राहुल पाटील यांनी कामाची व्याप्ती परिते जिल्हा परिषद मतदारसंघापुरती न ठेवता संपूर्ण करवीर विधानसभा मतदारसंघात वाढवावी. विकासात्मक कामांच्या माध्यमातून पी. एन. पाटील यांना बळकटी द्यावी, असे आवाहन ‘गोकुळ’ दूध संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केले.
जिल्हा परिषद सदस्यपदी राहुल पाटील यांची तर ‘भोगावती’ साखर कारखान्याच्या संचालकपदी धीरज डोंगळे यांची निवड झाल्याबद्दल ‘गोकुळ’च्यावतीने सोमवारी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
पाटील यांचा सत्कार संघाचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांच्या तर डोंगळे यांचा सत्कार अध्यक्ष पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. पाटील व डोंगळे दोघेही तरुण असून आगामी काळात दोघांनीही आक्रमकपणे कामे व संपर्क ठेवून आपल्या कामाचा ठसा उमटवावा, असेही अध्यक्ष पाटील यांनी सांगितले. आमच्या विजयात ‘गोकुळ’ दूध संघाचा मोठा वाटा असून आगामी काळात असेच पाठबळ आम्हाला द्यावे, असे राहुल पाटील व धीरज डोंगळे यांनी सांगितले.
यावेळी संचालक रवींद्र आपटे, अरुण डोंगळे, विश्वास जाधव, धैर्यशील देसाई, पी. डी. धुंदरे, उदय पाटील, बाळासाहेब खाडे, अमरीश घाटगे, सत्यजित पाटील, विलास कांबळे, अनुराधा पाटील, जयश्री पाटील-चुयेकर, रामराजे कुपेकर, बाबा देसाई, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर आदी उपस्थित होते. ‘गोकुळ’च्यावतीने जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील व ‘भोगावती’चे संचालक धीरज डोंगळे यांचा सत्कार सोमवारी करण्यात आला. यावेळी अनुराधा पाटील, जयश्री पाटील, विलास कांबळे, रामराजे कुपेकर, अरुण डोंगळे, पी. डी. धुंदरे, विश्वास पाटील,अरुण नरके, रवींद्र आपटे, विश्वास जाधव, बाळासाहेब खाडे आदी उपस्थित होते.