उजळाईवाडी (ता. करवीर) येथील कंजारभाट वसाहत येथे गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यातील पोलिसांनी बुधवारी दुपारी गावठी दारू अड्ड्यार छापा टाकून जमिनीत पुरलेली रसायनयुक्त दारुची बॅरेल जप्त केली. यात छाप्यात ३६ हजार आठशे रुपये किमतीचा माल जप्त केला. याप्रकरणी तिघांवर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी
बुधवारी उजळाईवाडी येथे कजारभाट वसाहतीमध्ये अचानक छापा टाकला. यावेळी जमिनीत पुरलेली कच्चे रसायनची आठ बॅरल मिळून आली. गावठी दारूसाठी या रसायनचा बेकायदेशीरपणे विनापरवाना वापर होत होता. पोलिसांनी ही दारू जप्त केली. याप्रकरणी सतीश जनार्दन गुमाने, कृष्णा विष्णू गुमाने, कार्तिक अशोक गागडे (सर्व रा. उजळाईवाडी, ता. करवीर) या तिघांवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला.