कोल्हापूर : कंदलगाव परिसरातील केएमटी कॉलनी येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर करवीर विभागाचे पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या पथकाने शुक्रवारी छापा टाकून खेळत असलेल्या सतरा जणांसह १ लाख ८८ हजारांचा मुददेमाल ताब्यात घेतला. याप्रकरणी शुक्रवारी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोद झाला.पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंदलगाव पाचगाव रोडवरील केएमटी कॉलनी येथील संशयित संदीप सदाशिव इंगवले हा हरीष राजेंद्र ओसवाल (वय३३,रा. प्रतिभानगर) यांच्याशी संगनमत करून राहत्या घरी जुगार अड्डा चालवत की असल्याची खबर पथकाला मिळाली . त्यानुसार गुरुवारी रात्री याठिकाणी छापा टाकला. येथे दोघासह सतरा जण येथे तीन पानी पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची दिसून आले.
यावेळी रोख रक्कम ९,६३० व ५५ हजार ५०० रुपये किमतीचे १४ मोबाईल संच, १ लाख १० हजार किमतीचा चार मोटारसायकल टेबल खुर्चा असा एकूण एक लाख ८८ हजारांचा मुददेमाल पोलिसांनी जप्त केला
इंगवले व ओसवाल या संशयितासह बाबासो विठ्ठल पुजारी (वय ३५, रा.वाशी,ता. करवीर), धुलेंद्र नवनाथ पवार (३९, रामानंद नगर), नंदकुमार रामचंद्र गायकवाड ( ५२, महालक्ष्मी नगर, मंगळवार पेठ), सदानंद महादेव पाडळकर (४८, पाडळकर वसाहत, हॉकी स्टेडीयमजवळ), बादशहा नबीसाब शेख (४२, रंकाळा टॉवर), किरण अनंत गवळी ( ६२, मंगळवार पेठ), श्रावण दत्तु भालकर ( ४५, •ाारती विद्यापीठजवळ, कंदलगाव), प्रसाद राजाराम भोरे ( ३७, सु•ााषनगर), सागर संभाजी पाडळकर (४०, पाडळकर वसाहत), मोनेश्री भिमण्णा पाटील (४३, कंदलगाव), मिलिंद मारूती गुरव (२९, कळंबा, ता. करवीर), उत्तम रघुनाथ •ोसले (४६, जुना बुधवार पेठ ), कमलेश पुनमचंद ओसवाल (३९, भक्तीपुजा नगर), संतोष विठ्ठल आडनाईक ( ४२, मंगळवार पेठ), अभिजीत राजेंद्र पवार ( ३३, कंदलगाव) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहे. या सर्वांवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.