गांधीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीच्या दारूचा साठा व विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने अजय माने याच्या घरासमोर असलेल्या पान टपरीच्या बाजूला एका पोत्यात ठेवलेली पाच हजार रुपयाची गोवा बनावटीची दारू छापा टाकून पकडली. याबाबतची फिर्याद हवालदार कृष्णात बाळासाहेब पिंगळे यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली असून एका विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. या पथकामध्ये सहायक फौजदार अजय गोडबोले, हवालदार वसंत पिंगळे, सचिन देसाई, दीपक घोरपडे, अनमोल पवार, केसरे यांचा समावेश होता.
मुद्देमाल केवळ ५ हजार?
इतक्या मोठ्या फौजफाट्यासह आलेल्या या पथकाने केवळ पाच हजार रुपयांची दारू पकडल्याची नोंद केली आहे. प्रत्यक्षात मात्र दारूचा मोठा साठा सापडल्याची उलटसुलट चर्चा सुरू आहे.