अश्विनी बिद्रे खून प्रकरणी दोघांची चौकशीलोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांच्या खुनाचा कट मुख्य सूत्रधार अभय कुरुंदकरने आजरा (जि. कोल्हापूर) येथील हाळोली येथील फार्म हाऊसवर रचल्याचा संशय आहे. त्यानुसार मुंबईच्या विशेष पथकाने रविवारी या फार्म हाऊससह तो राहत असलेल्या नातेवाइकांच्या घरी छापे टाकले. या कटाची माहिती व सहभागी असलेल्या स्थानिक दोघा संशयितांनाही पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे.पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याचे लहानपण व शिक्षण आजरा येथे गेले आहे. चार-सहा महिन्यांनी त्याचे आजºयाला येणे-जाणे असायचे. आजरा- हाळोली येथे त्याचा फार्म हाउस आहे. याच ठिकाणी अश्विनी बिद्रे यांच्या खुनाचा कट त्याने बालपणीचा मित्र महेश फळणीकरला घेऊन रचल्याचा पोलिसांना संशय आहे. अश्विनी यांचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी या दोघांंनी येथील स्थानिक दोघा व्यक्तींच्या मदतीने ह्यवूडकटरह्ण उपलब्ध केले. त्यानंतर हे वूडकटर त्यांनी आजरा ते कोल्हापूर शहर या परिसरात गायब केल्याचे समजते. त्यानुसार मुंबईच्या पथकाने दोन दिवसांपूर्वी दोघा व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर रविवारी सकाळी कुरुंदकरच्या फार्म हाऊससह तो राहत असलेल्या नातेवाईक भास्कर ऊर्फ वसंत गोरे यांच्या घराची पोलिसांनी झाडाझडती घेतली. पोलिसांनी फार्म हाउसवरील सुरक्षारक्षकासह नातेवाइकांचे जबाब घेतले. गुन्ह्यात वापरलेले ह्यवूडकटरह्ण मिळणे पोलिसांसाठी महत्त्वाचे असल्याने पथकाने फार्म हाउसचा व आजूबाजूचा परिसर पिंजून काढला.मीरा भार्इंदर खाडीत आज शोधअश्विनी बिद्रे खूनप्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधार अभय शामसुंदर कुरुंदकर, ज्ञानदेव दत्तात्रय पाटील ऊर्फ राजू पाटील, कुंदन नामदेव भंडारी, महेश फळणीकर या चौघांना अटक केली आहे. कुरुंदकरने बिद्रे यांच्या मृतदेहाचे तुकडे वसईच्या खाडीत फेकल्याचे तपासात पुढे आले होते. दरम्यान, मीरा भार्इंदर खाडीमध्येही मृतदेहाचे तुकडे टाकल्याचे तपासात पुढे आले आहे. त्यानुसार आज, सोमवारी सकाळी मीरा भार्इंदर खाडीत शोधमोहीम राबविण्यात येणार आहे.१२ ठिकाणी चौकशीसंशयितांनी मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी वापरलेल्या वूडकटरची कोल्हापुरात विल्हेवाट लावल्याचे तपासात पुढे आले आहे. त्यामुळे मुंबईतील विशेष पथकाने गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यातील लाकूड वखारदारांसह भंगार विक्रेते, वूडकटर विक्रेते अशा बारा ठिकाणी चौकशी केली; परंतु वूडकटरचा शोध लागलेला नाही.
हाळोलीत कुरुंदकरच्या फार्म हाऊसवर छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 12:31 AM