शहरं
Join us  
Trending Stories
1
CM शिंदेंनी शिवसेनेचा पहिला उमेदवार केला जाहीर, जयस्वालांना 'या' मतदारसंघातून तिकीट
2
Shubham Lonkar: अकोल्याचा शुभम वर्षभरापासून लॉरेन्स टोळीच्या संपर्कात
3
भुजबळ-जरांगे समर्थक आमने-सामने; महामार्गावरील वाहतूक रोखली, येवल्यात तणाव!
4
Ind vs Aus Women: भारताच्या आशा मावळल्या! ऑस्ट्रेलियाने 9 धावांनी केला पराभव
5
पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती
6
छातीत कळ आली अन्...; नांदेडमध्ये 'लाडकी बहीण' कार्यक्रमाला आलेल्या महिलेचा मृत्यू
7
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?
8
Baba Siddique : 'ती' पोस्ट करणारा अकोल्याचा शुभम लोणकर भावासह फरार, पोलिसांकडून शोध
9
बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे 'रिअल इस्टेट' कनेक्शन?; केआरकेच्या पोस्टमुळे नवी चर्चा
10
Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं
11
बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर
12
नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल
13
'महाराष्ट्र राजकीय परिवर्तनासाठी सज्ज', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
14
१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!
15
चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?
16
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
17
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
18
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
19
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
20
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी

रूद्रच्या शोधासाठी सांगली जिल्ह्यात छापे

By admin | Published: September 20, 2015 2:02 AM

पानसरेंची हत्या : साधकांवरही नजर; छाप्यात ठोस धागेदोरे नाहीत

सांगली/कोल्हापूर : ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी गोव्यातील मडगाव बॉम्बस्फोटात पाहिजे असलेल्या काराजनगी (ता. जत) येथील फरारी संशयित रुद्रगौडा पाटील याच्यावर कोल्हापूर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्याच्यासह काही साधकांच्या शोधासाठी शुक्रवारी पोलिसांनी सांगली, मिरजेसह जत तालुक्यात छापे टाकले. पण हाती काहीच लागले नाही. दरम्यान, संशयित समीर गायकवाडच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त कायम आहे. गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर व सांगली पोलीस संयुक्तरीत्या कॉ. पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. साते ते आठ वर्षांपूर्वी गोव्यातील मडगावमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये सांगलीत पत्रकार म्हणून काम केलेला मलगोंडा पाटील (रा. काराजनगी) हा ठार झाला होता. मलगोंडा हा रुद्रगौडा पाटीलचा चुलत भाऊ आहे. स्फोटानंतर तो फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे पथक (एनआयए) अनेकदा सांगली व जत तालक्यात येऊन गेले आहे.पण त्यांचा काहीच थांगपत्ता लागलेला नाही. कॉ. पानसरेंच्या हत्येप्रकरणी समीर गायकवाडला अटक केल्यानंतर रुद्रगौडा पाटील पुन्हा चर्चेत आला आहे. त्याचाही हत्येमध्ये सहभाग असण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पुन्हा प्रयत्न सुरू ठेवले आहेत. शुक्रवारी पोलिसांनी सांगली, मिरज व जत तालुक्यांत छापे टाकले. मृत मलगोंडा पाटील याच्या काराजनगी येथील घरीही पोलीस जाऊन आले असल्याचे समजते. यासंदर्भात पोलिसांकडे विचारणा केली. परंतु, त्यांना हा तपासाचा भाग आहे, आम्हाला काहीच माहिती देता येत नाही, असे सांगून अधिक भाष्य करण्यास टाळले. रुद्रगौडा पाटीलच्या संपर्कात आलेल्या काही साधकांवर पोलिसांची नजर ठेवली आहे. त्यांचाशी शोध सुरू ठेवला आहे. मात्र, समीर गायकवाड अटक झाल्यापासून काही साधक गायब झाले असल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीतून पुढे आली आहे. (प्रतिनिधी)