कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात भजन, कीर्तन, कथ्थक, जागर अशा विविध भक्तिपर कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. मंदिरातील देवस्थान समितीच्या कार्यालयाजवळ स्टेज उभारणी करण्यात आली आहे. येथे सकाळी सात वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. त्यात रोज सकाळी सात ते आठ या वेळेत भावे काका यांचे श्रीसुक्त पठण होईल, तर आठ ते नऊ या वेळेत मंत्रविद्यावाचस्पती मयूरा जाधव यांचे मंत्रपठण होणार आहे. त्यानंतर सकाळी ९ वाजल्यापासून कोल्हापूरसह विविध शहरांतील संस्थांच्यावतीने सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. मंगळवार (दि. १३) : गीता मंदिर महिला भजनी मंडळ, स्वर माऊली भजनी मंडळ (करवीर), अंबाबाई भजनी मंडळ (परिते), मनुग्राफ भजन संध्या, मारुती गायन क्लब, मधुबन संगीत मैफल. बुधवार (दि. १४) : दत्त माऊली महिला भजनी मंडळ (टेंबलाईवाडी), महालक्ष्मी भजनी मंडळ (इचलकरंजी), शांभवी महिला भजनी मंडळ, संत कृपा सोंगी भजनी मंडळ, मेसर्स जाधव तालीम सुरेल संगीत भजनी मंडळ (वडणगे), पद्मन्यास कला अकादमी (इचलकरंजी). गुरुवार (दि. १५) : हरिप्रिया महिला भजनी मंडळ, महालक्ष्मी भजनी मंडळ, माऊली भजनी मंडळ, समर्थ महिला भजनी मंडळ, शाहीर रंगराव पाटील यांचा पोवाडा, स्वरगंधार संगीत कला अकॅडमी.शुक्रवार (दि. १६) : भवानी भजनी महिला मंडळ, दत्त माऊली महिला भजनी मंडळ, पार्वती महिला भजनी मंडळ, निरूपमा मिहाल भजनी मंडळ, गोल्डन मेमरीज चैत्राली अभ्यंकर, मंजुषा कुलकर्णी (मुंबई), दीपा उपाध्ये यांचे भरतनाट्यम्. शनिवार (दि. १७) : माऊली आध्यात्मिक भजनी मंडळ, सानेगुरुजी भजनी मंडळ, ज्ञानाई सांस्कृतिक मंडळ, पद्मजा कुलकर्णी (पुणे), वीरशैव अक्कमहादेवी भजनी मंडळ, अनिता पाटील याची भावगीते, भक्तिगीते, कामाक्षी शानबाग यांचे भरतनाट्यम्, अनंत तरंग (मिरज). रविवार (दि. १८) : ज्ञानेश्वर माऊली भजनी मंडळ, विठोबा मंदिर भजनी मंडळ, दत्त माऊली भजनी मंडळ, श्रद्धानंद महिला भजनी मंडळ, स्वरगंधार ग्रुप, श्रावण सखी. सोमवार (दि. १९) : विठूमाऊली भजनी मंडळ, दत्तगुरु भजनी मंडळ इचलकरंजी, राधाकृष्ण भजनी मंडळ, दुर्गामाता सोंगी भजनी मंडळ, बिंदू राव, कोमल व्हटकर यांचे भरतनाट्यम्, सुप्रिया किरपेकर (कराड) यांचे मंगळागौरीचे खेळ. मंगळवार (दि. २०) : सद्गुरू सेवा माऊली महिला भजन (उचगाव), वारणा ग्राहक मंडळ (वारणानगर), राधिका भजनी मंडळ, जिव्हाई सोंगी भजनी मंडळ, पल्लवी पाठक यांचे भावगीत, भक्तिगीत, स्वरगंगा मराठी वाद्यवृंद. बुधवार (दि. २१) : नवदुर्गा भजनी मंडळ, अंबिका महिला भजनी मंडळ, आरोही भजनी मंडळ (पुणे), भक्तिसेवा महिला भजनी मंडळ, शाहीर अनंतकुमार साळुंखे (सांगली), रूद्रांश अकॅडमी. गुरुवार (दि. २२) : सुलभा देशपांडे यांचे संस्कृत स्तोत्र पठण, शेषशाही नारायण महिला मंडळ, रेवणनाथ सांस्कृतिक मंडळ, शाकंबरी महिला मंडळ, भक्तिगंगा भजनी मंडळ, गौरी पाठारे (मुंबई) यांचे गायन. अंबाबाईची नवरात्रात विविध रूपे कोल्हापूर : नवरात्रौत्सवात अंबाबाईची रोज बांधली जाणारी सालंकृत पूजा हे कोल्हापूरच्या या साडेतीन शक्तिपीठाचे खास वैशिष्ट्य आणि आकर्षण असते. देवीच्या दर्शनासोबतच या पूजा पाहण्यासाठी देशभरातील लाखो भाविक उत्सवकाळात उपस्थित असतात. यंदा देवीची आदिलक्ष्मी, गजलक्ष्मी, अंबारीतील, विद्यालक्ष्मी, महिषासूर मर्दिनी अशा विविध रूपांत पूजा बांधण्यात येणार आहेत. बांधल्या जाणाऱ्या या पूजांचे दिवस आणि महत्त्व यांची माहिती अशी.४मंगळवार (दि. १३) : आदिलक्ष्मी : विश्वाची उत्पत्ती आदिशक्तीने केली. ब्रह्मांडाची उत्पत्ती आणि लयास कारणीभूत असलेली अंबाबाईचे हे मंदिर या आदिशक्तीचे असल्याने पहिल्या दिवशी आदिलक्ष्मी रूपातील पूजा असेल.४बुधवार (दि. १४) : धन-धान्य लक्ष्मी : ही देवी धन-धान्याची अधिष्ठाती आहे. संसारी जीवनात विपुल धन-धान्य मिळावे यासाठी देवीची उपासना केली जाते.४गुुरुवार (दि. १५) : धैर्यलक्ष्मी : जीवनात येणारी संकटे आणि संघर्षांना सामोरे जाताना धैर्याची गरज असते. मनातल्या भीतीवर मात करत धैर्य आणि पराक्रमाची ही देवता.४शुक्रवार (दि. १६) : गजलक्ष्मी : सौभाग्य आणि संपूर्ण कुटुंबाला ऐश्वर्य सुख, समाधान मिळावे यासाठी गजलक्ष्मीची उपासना केली जाते. ४शनिवार (दि. १७) : संतानलक्ष्मी : सद्गुणी संतान प्राप्ती आणि त्या संतानास आर्युआरोग्य देणारी देवता.४रविवार (दि. १८) : त्र्यंबोलीदेवी भेटीसाठी अंबारीतील : अंबाबाई ललिता पंचमीला आपली सखी त्र्यंबोलीदेवीच्या भेटीला जाते म्हणून यादिवशी अंबारीतील पूजा बांधली जाते. ४सोमवार (दि. १९ ) : विजयलक्ष्मी : केवळ रणांगणातच नव्हे तर दैनंदिन जीवनात आपण करत असलेल्या कार्यात यश मिळावे यासाठी या देवतेची उपासना केली जाते. ४मंगळवार (दि. २०) : विद्यालक्ष्मी : ज्ञानाची देवता ४बुधवार (दि. २१) : महिषासूर मर्दिनी : अष्टमीला या दुर्गेने महिषासूर राक्षसाचा वध केला. या दिवशी देवीचा जागर केला जातो म्हणून महिषासूर मर्दिनी रूपातील पूजा बांधली जाते. ४गुरुवार (दि. २२) : विजयादशमीनिमित्त रथातील : देवी आपला विजयोत्सव साजरा करण्यासाठी रथातून जाते. या संकल्पनेवर आधारित रथातील पूजा. ४शुक्रवार (दि. २३) : ऐश्वर्यलक्ष्मी : सर्व भौतिक व अलौकिक सुख, संपन्नतेची अधिष्ठाती. या पूजा आठवडेकरी श्रीपूजक नवन्याळकर कुलकर्णी व मयूर मुनिश्वर बांधणार आहेत. भक्त मंडळातर्फे पालखीसमोर गायननवरात्रौत्सवानिमित्त श्री महालक्ष्मी भक्त मंडळाच्यावतीने अंबाबाईच्या पालखीसमोर गायन सेवा अर्पण करण्यात येणार आहे. उत्सवकाळात रोज रात्री साडेनऊ वाजता अंबाबाईची पालखी निघते. या पालखीसमोर मंडळाच्यावतीने गायन सेवा सादर होणार आहे. तसेच आश्विन पौर्णिमेला महाप्रसाद होणार आहे. या महाप्रसादासाठी इच्छुक भाविकांनी महाद्वारातील देणगी मंडप, घाटी दरवाजा, दक्षिण दरवाजा व महालक्ष्मी धर्मशाळा ताराबाई रोड येथे धान्य रूपाने, तांदूळ, गहू, डाळ, तूप, गूळ, भाजी अशा जिन्नससह रोख स्वरूपात देणगी द्यावी, असे आवाहन अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी केले आहे.
अंबाबाई मंदिरात कार्यक्रमाची रेलचेल
By admin | Published: October 13, 2015 12:01 AM