कोल्हापूर : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शक्य त्या सर्व उपाययोजना प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मवर गर्दी होऊ नये यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट १० रुपयांऐवजी तब्बल ५० रुपये करण्यात आले. फलाटवरील गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो, त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी तिकिटामध्ये तब्बल पाचपटीने वाढ करण्यात आली आहे.केंद्र सरकारसोबतच राज्य प्रशासनाने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शक्य त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचा एक भाग म्हणून रेल्वे प्लॅटफॉर्मवरील तिकीट दरामध्ये वाढ केली आहे.कोरोनाचा फैलाव होऊ नये, रेल्वे स्थानकांवर विनाकारण गर्दी होऊ नये यासाठी हा निर्णय घेतला आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून या निर्णयांची अंमलबजावणीही कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथे क रण्यात आली आहे. मोजके प्रवासी वगळता दिवसभर स्थानकांवर शुकशुकाट होता.