शहरं
Join us  
Trending Stories
1
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!
2
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गाेठवले जाणार का? गुरुवारी हाेणार सुनावणी
3
शिंदेसेनेचे ४५ उमेदवार जाहीर; ९ मंत्र्यांना पुन्हा संधी; मुख्यमंत्री कोपरी पाचपाखाडीमधून लढणार
4
मनसेचे ४५ उमेदवार ठरले! मुंबईत १८ तर ठाण्यातून ७ उमेदवार; अमित ठाकरे माहीममधून रिंगणात
5
शेअर बाजार गडगडला! गुंतवणूकदारांचे ९.१९ लाख कोटी रूपये दिवसभरात स्वाहा!
6
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
7
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
8
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
9
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
10
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
11
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
12
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
13
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
14
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
15
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
16
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
18
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
19
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
20
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण

रेल्वे आरक्षणाचे नियम बदलले; आता ६० दिवस आधी रिझर्व्हेशन

By संदीप आडनाईक | Published: October 17, 2024 9:13 PM

लांबपल्ल्याच्या गाड्यांची तिकिटे आता केवळ दोन महिने आधीच फुल राहतील.

संदीप आडनाईक/कोल्हापूर, लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : दिवाळीपूर्वी रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांच्या सोयीसाठी आगाऊ आरक्षणाच्या सध्याच्या नियमात बदल केला आहे. आता प्रवासाचा दिवस सोडून १२० दिवसांऐवजी ६० दिवस आधी आरक्षण करता येणार आहे. यामुळे सामान्य प्रवाशांना फायदा होणार आहे. लांबपल्ल्याच्या गाड्यांची तिकिटे आता केवळ दोन महिने आधीच फुल राहतील.

मध्ये रेल्वेने यासंदर्भातील अधिसूचना १६ नोव्हेंबर रोजी जारी केली आहे. १ नोव्हेंबरपासून या नियमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नवी दिल्लीच्या प्रवासी मार्केटिंगचे संचालक संजय मनोचा यांनी जारी केलेल्या या अधिसूचनेनुसार ३१ ऑक्टोबरपर्यंतचे आरक्षण कायम राहतील, त्यात कोणताही बदल करण्यात येणार नाही. परदेशी प्रवाशांसाठी ३६५ दिवस आधी आरक्षण करण्याच्या नियमातही बदल झालेला नाही, अशी माहिती नमो रेल्वे पॅसेंजर वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष आणि मध्ये रेल्वेचे मुंबई सल्लागार समितीचे सदस्य अजय दुबे यांनी दिली.

या निर्णयामुळे सर्वसामान्य प्रवाशांना एक जानेवारीनंतरचे लांबपल्ल्याचे आरक्षण मिळणे दुरापास्त होणार आहे. पुढील दोन महिन्यांच्या बुकिंगसाठी प्रमुख आरक्षण केंदांबाहेर एजंटांनी बसवलेले भिकारी, गर्दुल्ले आणि बेकार तरुण यांच्या भल्यामोठ्या रांगा कमी होणार आहेत.

या निर्णयामुळे शुक्रवारी पुढील दोन महिन्यांचे आगाऊ आरक्षण सुरू होईल. यामुळे आरक्षण केंद्राबाहेरच्या परिसराचा ताबा घेणाऱ्या रेल्वे बुकिंग एजंटांचे मात्र नुकसान होणार आहे. सर्व आरक्षण केंद्राबाहेर लांब रांगा लागत, त्यात एकही अस्सल प्रवासी नसायचा. शुक्रवारी सकाळी खिडक्या उघडताच काही तासांतच पुढील १२० दिवसांचे रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचे बुकिंग फुल होत होते.

यापूर्वीच्या पद्धतीमुळे वाढलेला तिकिटांचा काळाबाजार रोखण्यात येईल. शिवाय सामान्य प्रवाशांना पुढील दोन महिन्यांनंतरची तिकिटे मिळण्याची शक्यताही वाढलेली आहे.-शिवनाथ बियाणी, सदस्य, पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समिती.

या नियमामुळे अतिशय कमी कालावधीत प्रवासाचे नियोजन करणाऱ्या सामान्य प्रवाशांना फायदा होणार आहे. रेल्वेला आरक्षणाचे पैसे वापरायला मिळणार नसले किंवा महसूल कमी मिळणार असला तरी सामान्य प्रवाशांचे पैसे अडकून राहणार नाहीत. यामुळे रेल्वेचा वाढलेला नफा दाखवून आगाऊ आरक्षण घेता येणार नाही.

-विनाेद ओसवाल, संचालक, 'नमो ट्रॅव्हल्स ॲन्ड टूर्स', भेंडे गल्ली.

असे बदलले रेल्वेचे आरक्षण कालावधी-एप्रिल १९८१ ते जानेवारी १९८५ : ९०-१ सप्टेंबर १९८८ ते ३० सप्टेंबर १९९३ : ४५-१ सप्टेंबर १९९५ ते ३१ जानेवारी १९९८ : ६०-१ मार्च २००७ ते १४ जुलै २००७ : ६०-१ फेब्रुवारी २००८ ते ९ मार्च २०१२ : १२०-१ मे २०१३ ते ३१ मार्च २०१५ : १२०

टॅग्स :kolhapurकोल्हापूर