शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

राज्यात रेल्वेत घातपाताची शक्यता, रेल्वे पोलीसांना सर्तक राहण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 2:46 PM

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राज्यातील महत्वाच्या रेल्वे स्थानक आणि रेल्वे गाडीमध्ये घातपात घडण्याची शक्यता असल्याचा अहवाल राज्य गुप्तवार्ता विभाग यांना इतर गोपनीय यंत्रणेकडून मिळाला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व रेल्वे स्थानकांची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. घातपाती कृत्यांच्या अनुषंगाने रेल्वे पोलीसांना सर्तक राहण्याचे आदेश राज्याचे पोलीस महासंचालकांनी दिले आहेत.

ठळक मुद्देराज्यात रेल्वेत घातपाताची शक्यता, रेल्वे पोलीसांना सर्तक राहण्याचे आदेश राज्य गुप्तवार्ताचा अहवाल

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राज्यातील महत्वाच्या रेल्वे स्थानक आणि रेल्वे गाडीमध्ये घातपात घडण्याची शक्यता असल्याचा अहवाल राज्य गुप्तवार्ता विभाग यांना इतर गोपनीय यंत्रणेकडून मिळाला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व रेल्वे स्थानकांची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. घातपाती कृत्यांच्या अनुषंगाने रेल्वे पोलीसांना सर्तक राहण्याचे आदेश राज्याचे पोलीस महासंचालकांनी दिले आहेत.लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. प्रस्थापित मातब्बरांच्या राजकीय वर्चस्वासाठी समाजात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी संघटनांकडून राज्यातील रेल्वे स्थानके लक्ष असल्याची गोपनिय माहिती गुप्तचर विभागाला आली आहे.

दोन दिवसापूर्वी कराड येथे कोयना एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरविण्यात आली. या प्रकारामुळे राज्यातील संपूर्ण सुरक्षा यंत्रणा खडबडून जागी झाली. निवडणुकीच्या धामधुमीत रेल्वेमध्ये काही अनिष्ट व्यक्ती प्रवेश करून घातपात घडवून आणण्याची शक्यता आहे. या घटनेच्या अनुषंगाने पोलीस महासंचालकांनी राज्यातील पोलीसांना सर्तक राहण्याचे आदेश दिले आहेत.

विशेषत: रेल्वेची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. कोल्हापूर रेल्वे स्थानकाची नियमित बॉम्बशोध पथकाकडून कसून तपासणी केली जात आहे. या परिसरात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची चौकशी करुन अंगझडती घेवून सोडले जात आहे. चौवीस तास याठिकाणी सशस्त्र बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.पोलीसांच्या सुट्या रद्दनिवडणुकीच्या धामधुमीत विविध पक्षांच्या प्रचार संभा होत आहेत. निवडणुक शांततेत पार पाडण्याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनावर आहे. निवडणुक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रजा, सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

 

टॅग्स :railwayरेल्वेPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर