कोल्हापूर: गेले चार दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने गुरुवारपासून पुन्हा भुरभुर सुरू केली आहे. दरम्यान पुढील चार दिवस पावसाचे असतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.जिल्ह्यात या आठवड्याची सुरुवात झाल्यापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. पूरस्थिती तयार होत असतानाच पाऊस थांबल्याने नदी काठासह प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला होता.दरम्यान गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात केवळ 13 मी.मी पाऊस झाला आहे. कुंभी, कासारी आणि कडवी जलाशय वगळता उर्वरीत धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाऊस गायब झाला आहे.गुरुवारी सकाळ पासून मात्र पुन्हा आभाळ भरून येत आहे. अधून मधून पावसाची हलकी सर ही येत आहे. पुढील चार दिवस असेच वातावरण राहील आणि जोरदार सरीही कोसळतील असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
अजूनही 16 बंधारे पाण्याखालीअजूनही 16 बंधारे पाण्याखाली आहेत. राजाराम बंधाऱ्यावर अजून दोन फूट पाणी असल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे.पावसाची उघडीप राहिली तर शुक्रवारी बंधारा खुला होणार आहे.