तालुक्यातील बांबवडे , आंबा , करंजपेण विशाळगड , उदागिरी , कानसा खोरा आदी परिसरात जोरदार वळवाचा पाऊस पडत होता . वादळी वाऱ्यामुळे आंबा , उदगिरी रस्त्यावरील झाडे उन्मळून पडली होती . दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले . वादळी वाऱ्यामुळे झाडावरील आंबे वाऱ्याने गळून पडले होते . काजू , करवंद , जांभूळ , रातांबी आदी रानमेव्याचे मोठे नुकसान झाले . वळवाच्या पावसाने शिवारात पाणी साचले होते . पावसाचे पाणी घरांच्या कौलातून बाहेर न पडल्यामुळे ग्रामीण भागातील साधी घरांना गळती लागली होती . मका , टोमॅटो , वांगी , कोबी , फ्लावर , भेंडी , कोथींबीर , गवार , आदी भाजीपाला पिकांचे नुकसान झाले.
शाहूवाडी तालुक्यात पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 4:24 AM