ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात पावसाची सकाळी भुरभुर दिवसभर उघडीप
कोल्हापूर : जिल्ह्यात बुधवारी सकाळी पावसाची भुरभुर राहिली. मात्र दिवसभर काही काळ ढगाळ वातावरण राहिले असले तरी उघडीप होती. धरणक्षेत्रांतही पावसाने विश्रांती घेतली आहे.मंगळवारी दिवसभर कडकडीत ऊन पडले होते. मात्र बुधवारी सकाळी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची भुरभुर सुरू होती. दहानंतर पाऊस थांबला. थोडा वेळ ढगाळ वातावरण राहिले. दुपारी काही काळ ऊनही पडले होते. सायंकाळी आकाश एकदम स्वच्छ झाले.आज, गुरुवारी सकाळच्या टप्प्यात हलक्या सरी कोसळतील. दिवसभर मात्र पूर्णपणे उघडीप राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.