शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

‘पर्जन्य जलसंचय’ नगरसेवकांच्या घरापासून

By admin | Published: May 19, 2016 11:39 PM

महानगरपालिका, सतेज पाटील फौंडेशनचा निर्धार : उद्यानातील विहिरी, कूपनलिकांच्या पुनर्भरणाचा निर्णय

कोल्हापूर : महानगरपालिका आणि सतेज पाटील फौंडेशनतर्फे शहरात ‘पर्जन्य जलसंचय’ची (रेन वॉटर हार्वेस्टिंग) मोठी चळवळ उभी करण्याचा निर्धार गुरुवारी येथे झालेल्या या विषयावरील कार्यशाळेत करण्यात आला. चळवळीची सुरुवात या वर्षीच्या पावसाळ्यात नगरसेवकांनी त्यांच्या घरापासून करण्याचा तसेच महापालिकेच्या मालकीच्या उद्यानातील विहिरी, कूपनलिका पुनर्भरण करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. जनजागृतीबरोबरच पर्जन्य जलसंचयास प्रत्यक्ष मदत व मार्गदर्शन करण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच जलमित्रांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गतवर्षी पाऊस कमी पडल्यामुळे जिल्ह्याबरोबरच संपूर्ण शहरालाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावतआहे. भविष्यात अशा प्रकारे जर पाण्याची टंचाई भासू लागली तर त्यावर पर्याय म्हणून पर्जन्य जलसंचय हाच एकमेव पर्याय असल्याने त्याबाबत जनजागृती व मार्गदर्शन म्हणून गुरुवारी येथील केशवराव भोसले नाट्यगृहात महानगरपालिका व सतेज पाटील फौंडेशनतर्फे ‘पर्जन्य जलसंचय’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, नगरसेवक, पर्यावरणवादी कार्यकर्ते, जलमित्र, महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार सतेज पाटील यांनी सुरुवातीला कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट करून सांगितला. पावसाचे कमी होत असलेले प्रमाण, घटत चाललेली भूजल पातळी यांचा विचार करता पर्जन्य जलसंचयही आता आवश्यक बाब बनली असून, शहरातील प्रत्येक मिळकतधारकाने पावसाचे पाणी अडविले, जिरविले आणि त्याचा वापर केला तर पाणीटंचाईवर मात करता येईल. सध्या भेडसावत असलेल्या पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेता कोल्हापूर शहरात पर्जन्य जलसंचय उपक्रम घरोघरी राबविण्याची आवश्यकता आहे, असे पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)राजाराम रक्तवान : चाळीस वर्षे पावसाचे पाणी थेट स्वयंपाकघरातभारतीय वायुसेनेतील निवृत्त अधिकारी ८९ वर्षीय राजाराम रक्तवान यांनी स्वत:च्या घरातील पर्जन्य जलसंचयाची माहिती दिली. गेली ४0 वर्षे त्यांचा ‘ढगातून थेट स्वयंपाकघरात’ हा उपक्रम सुरू असून त्यामुळे आरोग्यास कसलीही बाधा निर्माण झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रक्तवान हे ११०० स्क्वेअर फुटांच्या छतावरील पावसाचे पाणी साठवितात. वर्षभराकरिता त्यांना १ लाख ३५ हजार लिटर पाणी उपलब्ध होते. दैनंदिन पाण्याचा हिशेबही त्यांनी लिहून ठेवला आहे. पाच व्यक्तींच्या कुटुंबाला दिवसाकाठी पिण्यासाठी १५ लिटर पाणी लागते. महिन्याला ४५० लिटर, तर वर्षाला ६००० हजार लिटर पाणी लागते. उरलेले सर्व पाणी ते घरखर्चासाठी वापरतात. यावेळी संदीप अध्यापकर (ठाणे), नितीन अतकरे (बार्शी), उदय गायकवाड, पारस ओसवाल, दीपक देवलापूरकर, अनिल चौगुले, आदींनी मार्गदर्शन केले; तर महापालिकेचे पर्यावरण अभियंता आर. के. पाटील यांनी आभार मानले. यावेळी महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, स्थायी समितीचे सभापती मुरलीधर जाधव, परिवहन सभापती लाला भोसले, महिला बालकल्याण सभापती वृषाली कदम, उपायुक्त विजय खोराटे, सहायक आयुक्त उमेश रणदिवे, नगर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यासह महापालिकेचे सर्व अभियंते उपस्थित होते. तज्ज्ञांकडून प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन कार्यशाळेत पर्जन्य जलसंचय या विषयात तज्ज्ञ असलेल्या व्यक्तींनी प्रात्यक्षिकांसह उपस्थितांना मार्गदर्शन केले. युनिटी कन्सल्टंटचे मिलिंद कुलकर्णी यांनी १००० स्क्वेअर फुटांच्या छतावरील पावसाचे पाणी अडवून ते टाकीत साठविल्यास वर्षाला ६५ हजार लिटर पाणी मिळते. हेच पाणी पिण्यासाठी किंवा खर्चासाठीही वापरता येते. पावसाचे पाणी कूपनलिका, विहिरी यांचे पुनर्भरण करण्यासाठीही वापरता येते; त्यामुळे भूगर्भातील पाणीपातळी वाढविता येते, असे सांगितले. नगरसेवकांपासूनच सुरुवात शहरातील ८१ नगरसेवकांनी स्वत:च्या घरापासून ही चळवळ राबविण्याची सूचना आमदार पाटील यांनी केली. त्याला सर्व नगरसेवकांनी तत्काळ होकार दिला. प्रत्येक नगरसेवकाने त्याच्या प्रभागातील ५० मिळकतधारकांना या उपक्रमात सहभागी होण्यास प्रोत्साहित करावे, असे आवाहन पाटील यांनी केले, त्याचाही स्वीकार नगरसेवकांनी केला.