अनिल पाटीलसरुड : चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी सुमारे १ हजार मि.मी. इतका पाऊस कमी झाला आहे. गतवर्षी ६ ऑगस्ट पर्यंत धरण क्षेत्रात २३८९ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली होती. तर यावर्षी केवळ १३५२ मि.मी. इतकी नोंद झाली आहे. दरम्यान सध्या धरणातील पाणीसाठा ८० टक्के इतका झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा पाणी साठा १० टक्क्यांनी कमी आहे. गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने सध्या धरणातील पाण्याचा विसर्गही पुर्णपणे बंद केला आहे.चांदोली धरण पाणलोट परिसर हा पावसाचे आगार म्हणून ओळखला जातो. गेल्या तांत्रीक वर्षात धरणक्षेत्रामध्ये ३००४ मि. मि. पावसाची नोंद झाली होती. यावर्षी जुन महिन्यात पावसाने ओढ दिल्याने ३४. ४० टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणातील पाणीसाठा १० टीएमसी पर्यंत निच्चांकी खाली आला होता. परंतु जुलै महिन्याच्या सुरुवातीस पावसाने दमदार हजेरी लावल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत गेली. मात्र, पावसाने पुन्हा विश्रांती घेतल्याने या धरणातील पाण्याची आवक कमी झाली.धरणात २७. ५३ टीएमसी पाणीसाठासध्या धरणात २७. ५३ टीएमसी पाणीसाठा आहे. धरणातील पाणीसाठा ७७९ . ७६ दलघमी इतका असुन पाणी पातळी ६१९ . ५० पर्यंत आहे. गतवर्षी आजअखेर हाच पाणीसाठा ३१ .०५ टीएमसी इतका होता. गतवर्षीच्या तुलनेत धरणात ३ .५२ टीएमसी इतका पाणीसाठा कमी आहे.
चांदोली धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण घटले, धरणात 'इतका' पाणीसाठा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2022 6:38 PM