शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 5:01 PM

गेल्या चार दिवसापासून उघडीप दिलेल्या पावसाने गुरुवारपासून पुन्हा जोर धरला. शुक्रवारी दिवसभर ऊन पावसाचा खेळ सुरु होता. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मात्र पावसाचा जोर वाढला आहे. पाटगाव जलाशयात अतिवृष्टी झाली आहे.

ठळक मुद्दे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढलागगनबावड्यात सर्वाधिक पाऊस, शिरोळ निरंक

कोल्हापूर: गेल्या चार दिवसापासून उघडीप दिलेल्या पावसाने गुरुवारपासून पुन्हा जोर धरला. शुक्रवारी दिवसभर ऊन पावसाचा खेळ सुरु होता. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मात्र पावसाचा जोर वाढला आहे. पाटगाव जलाशयात अतिवृष्टी झाली आहे.

गगनबावड्यात सर्वाधिक ३७ मिलीमीटर पाऊस झाला आहे. शिरोळमध्ये पावसाचा एक थेंबही नाही. आणखी दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात दुसऱ्यांदा महापुराची परिस्थिती निर्माण झाली होती. पंचगंगेसह सर्वच नद्यांनी इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली असतानाच सोमवारपासून पावसाने उसंत घेतली. परिणामी पूराचे पाणीही झपाट्याने ओसरु लागले. पात्राबाहेर पडलेल्या नद्या पुन्हा एकदा पात्राच्या येत असतानाच गुरुवारी दुपारपासून पावसाने पुन्हा हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.

किरकोळ पडणाऱ्या सरींची तीव्रता शुक्रवारी जास्तच झाली आणि कांही ठिकाणी मुसळधार सरी कोसळल्या. दिवसभर ढगाळ वातावरण आणि अधूनमधून सरी येत राहिल्या. गगनबावड्यात ३७, शाहूवाडीत १४, राधानगरीत १५, चंदगड व करवीरमध्ये ५, कागल व गडहिग्लज २, भूदरगड १0, आजऱ्यात १६ असा एकूण ११८ मि.मि पाऊस शुक्रवारी सकाळी ८ पर्यंत नोंदवला गेला.धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मात्र पावसात सातत्य आहे. पाटगाव जलाशात सर्वाधिक ९३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. कासारी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात ७२ तर जंगमहट्टी ७ मिलिमीटर वगळता १५ ते ४७ मिलीमीटर असा पाऊस सर्वच जलाशयात नोंदवला गेला आहे. पावसाचा जोर वाढत असलातरी अजून सांडव्यातून विसर्ग वाढलेला नाही. त्यामुळे नद्यांतील पाणी पातळीही वाढलेली नाही. 

 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर