कोल्हापूर : जिल्ह्यात शनिवारी दिवसभर पावसाची रिपरिप कायम राहिली आहे. गगनबावडा, शाहूवाडीसह जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यात मात्र पाऊस जोरदार आहे.गेले आठ दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर कमी असला तरी एक सारखा आहे. अधूनमधून जोरदार पाऊस कोसळत आहे. कोल्हापूर शहरातही पावसाची उघडझाप राहिली असून सायंकाळ नंतर पावसाचा जोर थोडासा वाढला.धरणक्षेत्रातही पाऊस चांगला असून विसर्ग कायम राहिला आहे. त्यामुळे नद्यांचे पाणी पातळी संथगतीने कमी होत आहे. पंचगंगेची पातळी २१ फुटापर्यंत असून अद्याप सोळा बंधारे पाण्याखाली आहेत.शनिवारी सकाळ आठ पर्यंत संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासर ९.७४ मिली मीटर पाऊस झाला. या चोवीस तासात जिल्ह्यातील आठ खासगी मालमत्तांची पडझड होऊन १ लाख २१ हजाराचे नुकसान झाले आहे.तालुकानिहाय पाऊस मिली मीटरमध्ये असा- हातकणंगले (२.८७), शिरोळ (३.८५), पन्हाळा (११.४३), शाहूवाडी (१८.५०), राधानगरी (११.५०), गगनबावडा (३२.८०), करवीर (४.०९), कागल (६.४३), गडहिग्लज (२.५९), भुदरगड (५.६०), आजरा (११.००), चंदगड (७.१६).
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची रिपरिप कायम, अद्याप सोळा बंधारे पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 4:40 PM
कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी दिवसभर पावसाची रिपरिप कायम राहिली आहे. गगनबावडा, शाहूवाडीसह जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यात मात्र पाऊस जोरदार आहे.
ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात पावसाची रिपरिप कायमअद्याप सोळा बंधारे पाण्याखाली