शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
3
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
4
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
5
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
6
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
7
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
9
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
10
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
11
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
12
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
13
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
14
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
15
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
16
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
17
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
18
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
19
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडझाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 6:33 PM

कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी दिवसभर पावसाची उघड-झाप राहिली. शहरात तर एक-दोनवेळेला आलेल्या पावसाच्या सरीवगळता पूर्णपणे उघडीप राहिली. धरण क्षेत्रातही पावसाची जोर कमी आल्याने राधानगरीसह इतर धरणांतून पाण्याचा विसर्ग कमी झाला आहे. जिल्ह्यातील नऊ बंधारे पाण्याखाली असून पंचगंगेची पातळी १८ फुटांवर आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात नऊ बंधारे पाण्याखाली राधानगरीतील विसर्ग कमी वारणा धरण फुल्ल!

कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी दिवसभर पावसाची उघड-झाप राहिली. शहरात तर एक-दोनवेळेला आलेल्या पावसाच्या सरीवगळता पूर्णपणे उघडीप राहिली. धरण क्षेत्रातही पावसाची जोर कमी आल्याने राधानगरीसह इतर धरणांतून पाण्याचा विसर्ग कमी झाला आहे. जिल्ह्यातील नऊ बंधारे पाण्याखाली असून पंचगंगेची पातळी १८ फुटांवर आहे.गेले दोन दिवस असणारा पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. रविवारी सकाळ पासून ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या सरी कोसळत राहिल्या. पण दहा वाजल्यापासून वातावरणात थोडा बदलत होत काही काळ ऊन, त्यानंतर ढग दाटून यायचे आणि पाऊस पडत राहिला.

गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, भुदरगड, आजरा, राधानगरी, चंदगड तालुक्यांत मात्र चांगला पाऊस सुरू आहे. करवीर, कागल, हातकणंगले मध्ये पाऊस कमी आहे. रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात ८० मिलीमीटर पाऊस झाला. सर्वाधिक गगनबावडा तालुक्यात २५.५० मिलीमीटर झाला.धरणक्षेत्रातही तुलनेने पावसाचा जोर कमी झाला असून धरणातून होणार विसर्गही कमी झाला आहे. राधानगरी धरण क्षेत्रात ३८ मिलीमीटर पाऊस झाला आहे. सांडव्यातून १४२८ तर वीजनिर्मितीसाठी २२०० असे ३६२८ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी बाहेर सोडले जात आहे. त्यामुळे पाऊस कमी असला तरी भोगावती नदीची फूग कायम आहे. पंचगंगेची पातळी १८ फुटांवर स्थिर आहे. पंचगंगा नदीवरील सहा व भोगावतीवरील तीन असे नऊ बंधारे पाण्याखाली आहेत.‘वारणा’ फुल्ल!

वारणा धरण पूर्ण क्षमतेने भरले असून त्यातून वीजनिर्मितीसाठी प्रतिसेकंद ७६१ घनफूट पाणी सोडण्यात येत आहे. जिल्ह्यातील बहुतांशी धरणे भरली असली तरी अद्याप दूधगंगा धरण रितेच आहे. धरण ९० टक्के भरले असून त्यातून ५२५ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.तालुकानिहाय पाऊस असा-

हातकणंगले - ०.१२, शिरोळ - निरंक, पन्हाळा - २.००, शाहूवाडी - १४.८३, राधानगरी - ७.८३, गगनबावडा - २५.५०, करवीर - ४.००, कागल - १.५७, गडहिंग्लज - ०.७१, भुदरगड - ८.००, आजरा - ५.५०, चंदगड - ९.८३.