शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
5
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
6
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
7
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
8
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
9
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
10
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
11
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
13
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
14
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
15
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
16
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
17
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
18
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
19
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
20
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

धुवाधार पाऊस!

By admin | Published: August 06, 2016 12:56 AM

जनजीवन विस्कळीत : पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीकडे; पडझडीत सुमारे ४० लाखांचे नुकसान; चांदोली धरणाचे दरवाजे उघडले; शिये-कसबा बावडा मार्ग बंद

कोल्हापूर : जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर धुवाधार पाऊस सुरू असून, ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. राधानगरीसह बहुतांश धरणांतून विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगेने धोका पातळीकडे आगेकूच केल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तब्बल ६७ बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. गेल्या चार दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी पावसाचा नूर काही वेगळाच होता. पहाटेपासून एकसारखा पाऊस सुरू राहिल्याने गटारी सोडाच, पण रस्त्यांवर पाणी मावेना इतका वेग पाण्याला होता. जमिनी उमळल्याने शेतवडीत पाणीच पाणी दिसत आहे. बांधफुटीमुळे भात, नागली, भुईमूग पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतीबरोबर घरांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. पंचगंगा, भोगावती, तुळशी, वारणा, कासारी, कुंभी, वेदगंगा, हिरण्यकेशी, घटप्रभा, ताम्रपर्णी, दूधगंगा, शाळी, धामणी व जांबरे या नद्यांवरील ६७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. धुवाधार पावसात आठ सार्वजनिक मालमत्तेची पडझड होऊन २४ लाख ६० हजार, तर ७० घरांची अंशत: पडझड होऊन १५ लाख ४० हजार असे ४० लाखांचे नुकसान झाले आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद ७९१२ घनफूट विसर्ग सुरू असल्याने भोगावती नदीच्या पाण्याला फुग अधिक आहे. वारणा धरण ९१ टक्के भरल्याने सतर्कता म्हणून ८३१ घनफूट विसर्ग सुरू ठेवला आहे. त्याशिवाय कासारी, कडवी, कुंभी, घटप्रभा धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू राहिल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगेची पातळी शुक्रवारी सकाळी आठ वाजता ३९.७ फुटांपर्यंत होती.सायंकाळी सहा वाजता त्यामध्ये तब्बल तीन फुटांनी वाढ होऊन ती ४१.८ पर्यंत पोहोचली आहे. अलमट्टी धरणात प्रतिसेकंद १ लाख २१ हजार ९३३ घनफूटची आवक, तर २ लाख ४० हजार ६९३ घनफूट पाण्याचा विसर्ग म्हणजे आवकापेक्षा दुप्पट विसर्ग होत असल्याने पंचगंगेच्या पाण्याची फुग काही प्रमाणात नियंत्रणात ठेवण्यात यश आले आहे. ओढे-नाले तुटलेपावसाचा जोर इतका भयंकर आहे की, ओढे-नाल्यांनीही रौद्र रूप धारण केले आहे. ओढे ओव्हरफुल होऊन शेतवडीत पाणी घुसत असल्याने अनेक ठिकाणी ओढे-नाले तुटल्याच्या घटना घडल्या आहेत. नऊ मार्गांवरील एस. टी. वाहतूक अंशत: बंदरंकाळा-अणुस्कुरा, भोगाव, चौके, आरळे, चंदगड ते मांदवडे, भुजवडे, इब्राहिमपूर, कुरणे, गगनबावडा ते सांगशी या मार्गांवर पाणी आल्याने एस.टी.ची वाहतूक अंशत: बंद झाली आहे. जिथे पर्यायी वाहतूक उपलब्ध आहे, त्या मार्गे वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. तालुकानिहाय पाऊस मिलीमीटरमध्ये असा-हातकणंगले-२०.७५, शिरोळ-१८.८५, पन्हाळा-७१.४२, शाहूवाडी-७३, राधानगरी-६६, गगनबावडा-७६, करवीर-३५.२७, कागल-४०.७५, गडहिंग्लज-१९.५७, भुदरगड-४५.६०, आजरा-४५.२५, चंदगड-४३.८३.धरणसाठा टी.एम.सी.मध्ये असा-धरण क्षमता सध्याचा साठा टक्केवारी धरण क्षेत्रातील पाऊस राधानगरी ८.३६१ ८.२९६ ९९ १२६तुळशी ३.४७१ २.५८७ ७४ ११७वारणा ३४.३९९ ३१.४९८ ९१ ७५दूधगंगा २५.३९२ १६.६९० ६५ ११५कासारी २.७५२ २.५३८ ९२ २३०कुंभी २.७१३ २.६०५ ९६ १४७पाटगाव ३.७१६ २.६३० ७० ६४शिवाजी पूल अखेर बंदकोल्हापूर : महाड येथील सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कोल्हापुरातील पंचगंगा नदीवरील १३८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी बांधलेल्या शिवाजी पुलावरील वाहतूक शुक्रवारी पूर्णत: बंद केली. वाहतूक बंद झाली तरी हौशी बघ्यांची गर्दी लक्षणीय होती. त्यामुळे या परिसराला अगदी पर्यटनस्थळासारखे स्वरूप आले होते. संततधार पावसामुळे दिवसभरात वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले. -वृत्त/पान २पूररेषेतील नागरिकांचे स्थलांतर सुरू पावसाचा जोर असल्याने राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला असून, नदीपात्रांसह नाल्यांमध्येही पाणी वाढत आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव पूररेषेत येणाऱ्या शहर, आसपासच्या भागांसह जिल्ह्यात रात्रीपासून नागरिकांचे स्थलांतर सुरू करण्यात आले आहे. -वृत्त/पान २महाद्वार रोडवर घराची भिंत कोसळून वृद्धा ठारदोघे जखमी : अतिवृष्टीचा परिणाम