शुक्रवारी सकाळपासूनच तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. धरण क्षेत्रामध्ये होत असलेल्या अतिवृष्टीमुळे वारणा आणि पंचगंगा नदीच्या महापुराचे पाणी नदीकाठच्या गावांमध्ये घुसले आहे. निलेवाडी गाव प्रशासनाने खाली करून संपूर्ण गाव स्थलांतरित केले आहे. खोची गावच्या भैरवनाथ मंदिराला महापुराचा वेढा पडला आहे. वारणाकाठच्या घुणकी, भादोले, लाटवडे, भेंडवडे, वाठार तर्फ, उदगाव, कुंभोजसह काठावरील गावांत महापुराचे पाणी घुसले आहे.
पंचगंगा नदीनेही रौद्ररूप धारण केले आहे. हालोडी, रुई, इंगळी, चंदूर, रेंदाळ, रांगोळी या गावांमध्ये महापुराचे पाणी घुसले आहे. बाधित कुटुंबांना प्रशासनाकडून स्थलांतरित करण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी दिवसभर पडणाऱ्या मुसळधार पावसाने नदीकाठच्या गावांना धडकी भरली आहे..
फोटो =
निलेवाडी येथे प्रशासनाने मदतकार्य राबवून गाव स्थलांतरित केले.