कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला धुवाधार पाऊस सोमवारीही कायम राहिला. धरणक्षेत्रातील मुसळधार पावसाने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली. यामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी दुपारपर्यंत ४० फुटांवर येऊन धोका पातळीकडे वाटचाल सुरू ठेवली. पावसाने तब्बल ७९ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली.
३८ राज्य, प्रमुख, इतर जिल्हा व ग्रामीण मार्ग बंद राहिल्याने पर्यायी मार्गांवरून वाहतूक वळविण्यात आली. तर जिल्ह्यातील ११६२ ट्रान्सफार्मर पाण्यामुळे बंद असल्याने महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून धुवाधार पाऊस सुरू आहे; त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नदी काठच्या गावांसह पाणी येणाऱ्या भागात सतर्कतेचे आदेश देत परिस्थितीवर नियंत्रण ठेवले जात आहे. शहरातील सखल भागांत पाणी साचल्याने ठिकठिकाणी डबक्याचे स्वरूप आले होते. त्यामुळे वाहनधारकांना कसरत करूनच मार्गक्रमण करावे लागत होते. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून धुवाधार पाऊस सुरू असून सोमवारीही पावसाचा जोर कायम राहिला; त्यामुळे करवीर तालुक्यातील कळंबा तलाव असा पूर्ण क्षमतेने ओसंडून वाहू लागला. हे पाणी पाहण्यासाठी नागरिकांची अशी गर्दी झाली होती.
जिल्ह्यात गगनबावडा, आजरा, शाहूवाडी, कागल, भुदरगड, पन्हाळा, राधानगरी, चंदगड तालुक्यांत मुसळधार पाऊस सुरू राहिल्याने नद्या व नाल्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली. पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथील पाणीपातळी दुपारी ४० फुटांवर जाऊन धोका पातळीकडे तिची वाटचाल सुरू राहिली.
धुवाधार पावसामुळे जिल्ह्यातील ७९ बंधारे पाण्याखाली जाऊन वाहतूक कोलमडली. तर राज्यमार्ग ६, प्रमुख जिल्हामार्ग १३, ग्रामीणमार्ग ५ व इतर जिल्हामार्ग १४ असे ३८ मार्ग बंद राहिले. या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गावरून वळविण्यात आली.
तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये असा -हातकणंगले (१३.६२), शिरोळ (१४.००), पन्हाळा (३७.८६), शाहूवाडी (५६.३३), राधानगरी (६३.००), गगनबावडा (६५.५०), करवीर (२६.६३), कागल (४०.४३), गडहिंग्लज (३२.७१), भुदरगड (६७.४०), आजरा (७३.२५), चंदगड (७४.५०).
कडवी धरण शंभर टक्के भरलेधरणक्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कडवी धरण शंभर टक्के भरले. राधानगरी धरण ८१ टक्के भरले असून येथून १६०० क्युसेक्स विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. वारणा ८३ टक्के भरले असून येथून ७७५ क्युसेक्स विसर्ग सुुरू आहे. तर दूधगंगा धरण ७३ टक्के इतके भरले आहे.
जिल्ह्यातील ११६२ विद्युत ट्रान्सफार्मर बंदविभाग ट्रान्सफार्मर फिडर उच्चदाब वाहिनी लघुदाबवाहिनीकोल्हापूर शहर ३८ १ २३७ ४२१कोल्हापूर ग्रामीण-१ ५३२ - ८२१ १३४१कोल्हापूर ग्रामीण- २ १७४ - - -इचलकरंजी १०४ ५ १ -जयसिंगपूर २१८ - ७३ १३३गडहिंग्लज ९६ - - -एकूण ११६२ ०६ ११३२ १८९४