यंदा पावसाने जून महिन्याच्या सुरुवातीलाच दमदार हजेरी लावल्याने शेतकरीवर्ग सुखावला आहे. तालुक्यातील सर्वच भागात चांगला पाऊस झाल्याने लागवडीच्या भातपिकासाठी तो पोषक असल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त केल्या जात आहेत. हेरे-तिलारी, जांबरे-उमगाव भागात झालेल्या पावसामुळे ताम्रपर्णी नदी पात्राबाहेर पडली होती. तालुक्यातील अनेक भागात रताळी लागवड हंगाम साधण्यात आला.
हेरे-तिलारी भागात रोप लागवडीच्या भाताची पेरणी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केल्यामुळे या भागात रोप लागवडीच्या कामाला सुरुवात झाली असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. फाटकवाडी, जांबरे हे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून, जंगमहट्टी हा मध्यम प्रकल्प ४४ टक्के भरला आहे.
फोटो ओळ : जांबरे (ता. चंदगड) येथे भात रोपे काढणीत मग्न असलेल्या महिला.
क्रमांक : २४०६२०२१-गड-०२