कोल्हापूर : शहरात झालेल्या महास्वच्छता अभियानात २ टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आला. मोहिमेचा ८९ वा रविवार असून महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनीही मोहिमेत सहभाग घेतला.
स्वरा फौंडेशनच्या वतीने जयंती पंपींग स्टेशन येथे स्वच्छता करुन वृक्षारोपण केले. यावेळी स्वरा फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद माजगावकर, शाखा अभियंता आर. के. पाटील, डायरेक्टर प्राजक्ता माजगावकर, महिला जिल्हाध्यक्ष सविता पाडळकर, उपाध्यक्ष आदित्य पाटिल, पीयूष हुलस्वार, आरोग्य अधिकारी डॉ.अशोक पोळ, अमित देशपांडे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, निखिल पाडळकर आदी उपस्थित होते.
चौकट
स्वच्छ केलेला परिसर
साने गुरुजी वसाहत ते जुना वाशीनाका मेनरोड, सीपीआर चौक ते तोरस्कर चौक, पंचगंगा घाट परिसर, सायबर चौक ते शिवाजी विद्यापीठ चौक, ताराराणी चौक ते शिरोली जकात नाका मेनरोड, डीएसपी ऑफिस चौक ते लाईन बझार चौक संपूर्ण परिसर
महापालिकेची यंत्रणा
चार जेसीबी, सहा डंपर, सहा आरसी गाड्या, तीन औषध फवारणी व एक पाणी टँकर, महापालिकेचे १५० कर्मचारी.
फोटो : १००१२०२१ कोल केएमसी स्वच्छता १
ओळी : कोल्हापूर महापालिकेच्या वतीने रविवारी शहरात स्वच्छता मोहीम राबविली. यावेळी सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला होता.
फोटो : १००१२०२१ कोल केएमसी स्वच्छता २
ओळी : स्वच्छता मोहिमेत स्वत: महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी हातात झाडू घेऊन स्वच्छता केली.