गडहिंग्लज : मराठा आरक्षण व इतर मागण्या तसेच आझाद मैदान येथे नियुक्तीच्या प्रतीक्षेत बसलेल्या उमेदवारांना नोकरीत सामावून घेण्यासाठी येत्या अधिवेशनात विधिमंडळात आवाज उठवा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चातर्फे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनात, सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाचा विषय घटनापीठाकडे सुपूर्द करताना स्थगितीचे आदेश दिले आहेत. राज्य शासनाने दाखल केलेल्या अर्जावर झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती उठविण्यास नकार दिला आहे. त्यामुळे मराठा समाजाची सध्याची परिस्थिती व त्यांच्या मागण्या विधिमंडळात मांडून मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा.
शिष्टमंडळात किरण कदम, शिवाजीराव भुकेले, डॉ. किरण खोराटे, हारुण सय्यद, सचिन देसाई, नेताजी पाटील, अमर चव्हाण, गुंडू पाटील, अमर मांगले, शिवाजी कुराडे, आदींचा समावेश होता.
------------------------
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना सकल मराठा समाजातर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, किरण कदम, शिवाजीराव भुकेले, हारुण सय्यद, आदी उपस्थित होते.
क्रमांक : १३१२२०२०-गड-१०