शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
2
पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
3
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
4
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
5
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
6
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
7
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
8
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
9
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
10
पत्नी, वडिलांचा अपमान करणाऱ्याचा काढला काटा, पनवेलमधील घटना, उत्तर प्रदेशातून १ अटकेत
11
मार्गिकांसाठी आता वांद्रे-खार पादचारी पूल तोडणार, पश्चिम रेल्वेवरील हार्बरचे वेळापत्रक ६ महिने विस्कळीत राहणार
12
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
13
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
14
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
15
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
17
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
18
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
19
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
20
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा

बचत गटांच्या उत्पादनासाठी मॉल्स उभारू : केसरकर

By admin | Published: February 05, 2015 12:08 AM

ताराराणी महोत्सवाला प्रारंभ : कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे जिल्ह्णांतील महिला बचत गट सहभागी

कोल्हापूर : बचत गटातील महिलांच्या उत्पादनास बाजारपेठ उपलब्ध होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. बाजारपेठ मिळण्यासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर, आदी ठिकाणी मॉल्स उभारू, असे आश्वासन ग्रामविकास, वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी दिले.येथील प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर विभागीय पातळीवरील ‘ताराराणी महोत्सव २०१५’च्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. सहकार, पणन व बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अविनाश सुभेदार, अध्यक्ष विमल पाटील यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते फीत कापून आणि दीपप्रज्वलनाने महोत्सवाचे उद्घाटन झाले. १० फेब्रुवारीअखेर प्रदर्शन चालणार आहे.मंत्री केसरकर म्हणाले, सध्या नवी मुंबई येथे बचत गटांच्या उत्पादन विक्रीसाठी एक मॉल आहे. याच धर्तीवर राज्यातील प्रमुख शहरांतही मॉल्स उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. परिणामी यावर मंत्रिमंंडळाच्या बैठकीत लवकरच हा निर्णय होईल. कोल्हापूरकरांच्या रक्तात आणि नसानसांत लढाऊपणा भिनला आहे. सर्किट बेंचसाठी सुरू असलेले आंदोलन हे एक उदाहरण आहे. माझे आजोळ आजरा आहे; त्यामुळे कोल्हापूरशी माझे अतूट नाते आहे. पालकमंत्री पाटील म्हणाले, अर्थशास्त्राच्या नियमानुसार महिला बचतगटाची प्रगती एका विशिष्ट टप्प्यात थांबली आहे. आता ज्या टप्प्यात आहे, तेथून अधोगतीला येऊ नये यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. आमचे सरकार प्रशासनाचे नसून जनतेचे आहे. तालुका पातळीवरील अपूर्ण विक्री केंद्रांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी सचिवांकडून परवानगीसाठी प्रयत्न करणार आहे. सचिव परवानगी नाकारणारे कोण? हायवेशेजारी जागा शोेधून मॉल्स उभारले जातील. मॉल्स आणि तालुका विक्री केंद्रांत विक्री होतील त्या दर्जाच्या आणि तोडीच्या वस्तू तयार कराव्यात. अन्यथा विक्री केंद्र आणि मॉल्सना ‘थडग्या’चे स्वरूप येईल. यावेळी अध्यक्षा पाटील, महिला व बालकल्याण सभापती ज्योती पाटील, सीईओ अविनाश सुभेदार यांची भाषणे झाली. बहिरेवाडी येथील आयेशा महिला बचत गटांना राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शाहीर आझाद नाईकवाडी यांच्या शाहिरीने कार्यक्रमास प्रारंभ झाला. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक पी. बी. पाटील यांची भाषणे झाली. माजी अध्यक्ष संजय मंडलिक, अरुण इंगवले, सीमा पाटील, किरण कांबळे, उपायुक्त इंद्रजित देशमुख, उपस्थित होते. डॉ. एम. एस. निर्मळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)दादांची ताकद मोठीचंद्रकांतदादा चांगल्या अधिकाऱ्यांच्या नेहमीच पाठीशी राहतात. कोल्हापूर जिल्ह्णातील चांगले अधिकारी सिंधुदुर्ग जिल्ह्णासाठी मागितले आहेत. मात्र, ते सोडायला तयार नाहीत. राज्यात आणि दिल्लीतही त्यांची ताकद मोठी ताकद आहे, असे कौतुक मंत्री केसरकर यांनी केले.