खोची (वार्ताहर) : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक कामाला लागा. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायचीच आहे. सभासदांच्या बरोबर प्रत्यक्ष संपर्क साधून भूमिका समजावून सांगा, असा सल्ला रविवारी पालकमंत्री सतेज पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला.
नरंदे येथे शरद सहकारी साखर कारखान्याचे संचालक बबन भंडारी यांच्या निवासस्थानी मंत्री पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी आमदार राजू आवळे उपस्थित होते.
मंत्री पाटील म्हणाले, राजाराम कारखाना निवडणुकीत गतवेळी थोडक्यात विजय हुकला. नरंदे परिसरातून चांगले मतदान झाले होते. यावेळी अधिक जोमाने काम करून मताधिक्य वाढविण्यासाठी प्रयत्न करा. यावेळी वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक चेतन चव्हाण, सरपंच रवींद्र अनुसे, माजी उपसरपंच अभिजित भंडारी, सचिन कोळी, राजू खरोशे, संदीप चौगुले, कपिल भंडारी, संदीप भंडारी, अण्णासाहेब खोत, विनोद भंडारी, आनंदा खोत, संतोष भंडारी, आदी उपस्थित होते.
चौकट-रविवारी मंत्री सतेज पाटील यांचा नरंदे गावातील दौरा महत्त्वपूर्ण असा होता. राजाराम साखर कारखान्याचे विद्यमान संचालक सिद्धू नरबळ यांच्या चुलत भावाच्या मुलीच्या विवाहाला ते उपस्थित राहिले. त्यामुळे लग्नमंडपात याची कुतूहलाने चर्चा रंगली.
फोटो ओळी-नरंदे येथे पालकमंत्री सतेज पाटील यांचा सत्कार बबन भंडारी यांच्या हस्ते व आमदार राजू आवळे यांचा सत्कार रवींद्र अनुसे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राजू खरोशे, चेतन चव्हाण उपस्थित होते. (छाया-आयुब मुल्ला)