शिरोळ : वंचित, दलित बहुजनांना समतेने वागवून त्यांना स्वाभिमानाने जगण्याचे बळ राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी दिले. प्रत्येक जाती व धर्मामध्ये ज्ञानाची गंगोत्री वसतिगृहे व विद्यालयांच्या माध्यमातून पोहोचवली. त्यांनी बहुजन समाजाला ५० टक्के आरक्षण देऊन क्रांतिकारक कार्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या विचारांची गरज आहे, असे प्रतिपादन जि. प. सदस्य दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांनी केले.
तमदलगे (ता. शिरोळ) येथील दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार शिरोळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीच्या कार्यस्थळावर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी राजर्षी शाहूंच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष अनिल कांबळे यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याचा आढावा विषद केला. स्वागत कार्यकारी संचालक दिलीप काळे यांनी केले. याप्रसंगी अमरसिंह धुमाळ, सदाशिव बन्ने, चिंतामणी निर्मळे, विवेक कुलकर्णी, सुहास राजमाने, विशाल बरमे, राजेंद्र शेवाळे, नायकू माने, सतीश राजमाने, जगदीश जाधव, फारुक मुजावर, ओंकार रौदे, प्रमोद भोसले उपस्थित होते. सूत्रसंचालन जनरल मॅनेजर जी. आर. माने तर रितेश शिंदे यांनी आभार मानले.
फोटो - २७०६२०२१-जेएवाय-०९
फोटो ओळ - तमदलगे (ता. शिरोळ) येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी डॉ. अशोकराव माने, अनिल कांबळे, अमरसिंह धुमाळ, जी. आर. माने, सदाशिव बन्ने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.