शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
4
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
5
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
6
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
7
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
8
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
9
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
10
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
11
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
12
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
13
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
14
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
15
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
16
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
17
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
18
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
19
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
20
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!

चित्रपट महामंडळ अध्यक्षपदी राजेभोसले निश्चित

By admin | Published: April 27, 2016 11:38 PM

निवड ५ मे रोजी : संचालकांच्या बैठकीत निर्णय

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत समर्थ पॅनेलचे प्रवर्तक आणि महामंडळाचे माजी अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या अध्यक्षपदावर बुधवारी १२ संचालकांच्या झालेल्या अनौपचारिक बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. अध्यक्षपदाची निवड ५ मे रोजी होणार आहे. राजेभोसले यांच्या नेतृत्वाखाली समर्थ पॅनेलची घोषणा झाल्यानंतर राजेभोसले यांनी महामंडळाच्या ३९०७ सभासदांपर्यंत भेटून पॅनेलची ध्येय-धोरणे सांगितली. त्यांच्या या कामामुळे १४ पैकी १२ संचालक महामंडळाच्या निवडणुकीत निवडून आले. याबद्दल बुधवारी सायंकाळी पाच वाजता राजेभोसले यांच्यासह १२ संचालकांनी महामंडळाच्या कार्यालयाला भेट दिली. महामंडळाच्या फलकाला पुष्पहार अर्पण करून सभागृहात संचालकांची अनौपचारिक बैठक झाली. त्यात अध्यक्षपदासाठी मेघराज राजेभोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. महामंडळाचा कारभार यापुढे पारदर्शक आणि सभासदांना केंद्रबिंदू मानून करणार आहे. मागील संचालकांनी केलेल्या घोटाळ्यांचा अभ्यासही यादरम्यान करून त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाईल. महामंडळाचा यापुढचा कारभार ‘पेपरलेस’ असणार आहे. महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी माझीच निवड सहकाऱ्यांनी केली असून, ही निवड ५ मे रोजीच्या पहिल्या बैठकीत होईल. त्यातून पुढील कार्यकारिणीही निवडण्यात येईल. - मेघराज राजेभोसले, प्रवर्तक, समर्थ पॅनेलविजय पाटकर १८ मतांनी विजयीकोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत मेघराज राजेभोसले यांच्या ‘समर्थ पॅनेल’ने १२ जागा मिळवत बहुमत मिळवले. विद्यमान अध्यक्ष विजय पाटकर यांनी सुशांत शेलार यांच्यावर १८ मतांनी विजय मिळविला. बुधवारी मध्यरात्री या मतमोजणीदरम्यान प्रचंड गोंधळ व धक्काबुक्की झाल्याने पोलिसांना मतदान केंद्रावर पाचारण करावे लागले. दरम्यान, अभिनेता विभागाची मतमोजणी सुरू झाल्यावर प्रथम २ मतपत्रिकांचा ताळमेळ बसेना म्हणून समर्थ पॅनेलच्या उमेदवार सुशांत शेलार यांनी हरकत घेतली. त्यावर निवडणूक समितीने पुन्हा मतपत्रिका तपासल्या, त्यात दोन मतपत्रिकांचा ताळमेळ लागला. संपूर्ण मतमोजणी झाल्यानंतर अभिनेता गटात विजय पाटकरांना ५८४, तर सुशांत शेलार यांना ५६६ मते पडली. त्यामुळे पाटकर १८ मतांनी विजयी झाले. त्यावर शेलार यांनी फेरमतमोजणी घ्यावी, अशी मागणी निवडणूक निर्णय अधिकारी अ‍ॅड. के. व्ही. पाटील, यांच्याकडे केली होती.