शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
2
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
3
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
4
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
5
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
7
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
8
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
9
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
10
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
11
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
12
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
13
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
14
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
15
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
16
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
17
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
18
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
19
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
20
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 

Kolhapur- दगड फोडणाऱ्या राजूचा हातोहात कोट्यवधींचा चुना; शेळी-मेंढी पालन संस्था काढून केली फसवणूक 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 12:10 PM

कारनाम्याची हुपरी परिसरात चर्चा

तानाजी घोरपडेहुपरी : साधारण वीस वर्षांपूर्वी पोट भरण्यासाठी आई- वडिलांसह दगड फोडण्याचे व फरशी पॉलिश करण्याच्या मशीनवर तुटपुंज्या पगारावर काम करणारा राजेंद्र भीमराव नेर्लेकर हा आज कित्येक कोटींचा मालक झाला आहे. महागड्या आलिशान गाड्यांतून व सुरक्षारक्षकांच्या गराड्यात फिरताना पाहून शहरवासीयांना तोंडात बोटे घालावी लागत आहेत. त्याच्या या भामटेगिरी व फसवाफसवीचे पितळ आता उघडे पडले आहे. आंध्र पोलिसांनी त्याला अटक केल्याने त्याच्या कारनाम्याची चर्चा सुरू झाली आहे.

चरितार्थ चालविण्यासाठी त्याने सुरुवातीस चांदी दागिने तयार करण्याचे काम सुरू केले. या व्यवसायातून खऱ्या अर्थाने त्याच्या फसवाफसवीच्या उद्योगास सुरुवात झाली. चांदी व्यवसाय सुरू करण्यास ज्या महंमद मोमीन या मित्राने व कोल्हापुरातील शेठजीने मदत केली त्यांनाच त्याने टांग लावली. त्यानंतर सन २०१४-१५ मध्ये त्याने आरबीएन कंपनीच्या माध्यमातून शेळी- मेंढी पालन व विविध प्रकारच्या उद्योगांसाठी लोकांना उद्युक्त करण्यास सुरुवात केली. यासाठी हुपरीतीलच घोरपडे कॉम्प्लेक्समध्ये आलिशान ऑफिस सुरू केले. या माध्यमातून परिसर व राज्याबाहेरील शेकडो जणांना केवळ दोन वर्षांच्या कालावधीत कोट्यवधी रुपयांचा चुना लावून हा उद्योग बंद केला. त्यानंतर सन २०१७ मध्ये त्याने बिटकॉइन करन्सीच्या धर्तीवर स्वत:ची झिप करन्सी नावाची कंपनी स्थापन केली. या कंपनीची महाराष्ट्र, गोवा व गुजरातमध्ये विविध ठिकाणी आलिशान ऑफिस उघडून मधाळ बोलण्याने शेकडो जणांना फसविले. त्याच्याविरोधात अनेक राज्यातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्याचे संपूर्ण कुटुंब जेलची हवा खाऊन परतले आहे. फसवणूक झालेल्या अनेकांनी त्याची अनेकदा धुलाईही केली आहे. काहींनी पोलिसांच्या माध्यमातून जुजबी रक्कम पदरात पाडून घेऊन तडजोडही केली आहे. या ठकसेन राजूच्या मधाळ व लाघवी बोलण्याने फसून निमित्तसागर महाराजांनीही श्रावकांना सांगून या राजूला मोठी रक्कम दिली.

आता डॉल्फिनची करामत..या सर्व प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी सध्या त्याने डॉल्फिन नावाने शेअर मार्केटिंगची नवीन फर्म पुण्यात सुरू केली आहे. या फर्मच्या मोहजालात सुमारे पावणे दोनशे शिक्षक कोट्यवधी रुपयांसह अडकले आहेत. त्याच्या या सर्व फसवणुकीच्या उद्योगाची कुंडली स्थानिक गुन्हे अन्वेषणने खणून काढली असून सध्या हे प्रकरण आर्थिक गुन्हे अन्वेषणकडे पुढील तपासासाठी पाठविण्यात आल्याचे समजते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी