शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

Kolhapur Politics: शिरोळ विधानसभा मतदारसंघात बहुरंगी सामना रंगणार, राजू शेट्टी मैदानात उतरणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 1:37 PM

यड्रावकरांच्या भूमिकेकडे लक्ष : उल्हास पाटील, गणतपराव, घाटगेही मैदानात

संदीप बावचेशिरोळ : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. शिरोळविधानसभा मतदारसंघातही लढतीची उत्सुकता लागून राहिली आहे. विद्यमान आमदार डॉ . राजेंद्र पाटील-यड्रावकर शिवधनुष्य उचलणार की अपक्ष राहणार, याकडेही कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. गत निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाल्यामुळे माजी आमदार उल्हास पाटील यांनीदेखील दावा सुरू केला आहे. शरद पवार यांच्या भेटीमुळे दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील तुतारी वाजवणार का? याबाबतही तर्कवितर्क आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांना आमदारकीची ऑफर दिली होती. त्यामुळे महायुतीतून घाटगे यांच्या उमेदवारीची चर्चा असताना घाटगे यांनी उघडपणे आपली भूमिका अजूनही स्पष्ट केलेली नाही. स्वाभिमानीतील मरगळ दूर करण्यासाठी राजू शेट्टी विधानसभेच्या मैदानात उतरतील का? याकडेही कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.

गत विधानसभा निवडणुकीत राजेंद्र पाटील-यड्रावकर अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीतून राज्यमंत्रिपद मिळवले. राजकीय भूकंपात ते शिंदे सेनेसोबतच राहिले. आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदे सेनेकडून निवडणूक लढवणार का, याबाबत तर्कवितर्क असले तरी ते अपक्ष निवडणूक लढतील असे संकेत आहेत.

महाविकासमध्ये पेच..गत निवडणुकीत उल्हास पाटील यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे या विधानसभा मतदारसंघात दावा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसमोर शिरोळच्या जागेबाबत पेच निर्माण होण्याची शक्यता नाही. श्री दत उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनीदेखील विधानसभेची तयारी सुरू केली आहे. नुकतीच त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर चर्चेला उधाण आले होते. क्षारपड जमिनीच्या माध्यमातून पाटील यांनी मोठे काम उभे केले आहे. पवार यांच्या भेटीमुळे गणपतराव पाटील तुतारी वाजवणार का? याकडेही कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

माधवराव घाटगे यांचे मौनलोकसभा निवडणुकीवेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांना थेट आमदारकीची ऑफर दिली होती. घाटगे यांचे कारखान्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. भाजपकडून त्यांनी तालुक्यात निधी आणून विकासकामे केली आहेत. भाजपकडून घाटगे यांचा चेहरा पुढे येत असला तरी घाटगे यांनी अजूनही उघडपणे भूमिका जाहीर केलेली नाही.

तर शेट्टी मैदानात..स्वाभिमानीकडून सावकार मादनाईक यांचा आतापर्यंत पराभव झाला आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वाभिमानीमध्ये मरगळ आली आहे. यामुळे राजू शेट्टी यांनी विधानसभेची निवडणूक लढवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांतून होत आहे. त्यामुळे शेट्टी मैदानात उतरणार का, अन्य कोणाला संधी देणार याकडेही कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

२०१९ चे चित्रराजेंद्र पाटील-यड्रावकर - ९०,०३८उल्हास पाटील - ६२,२१४सावकार मादनाईक - ५१,८०४मताधिक्य - २७८२४

टॅग्स :kolhapurकोल्हापूरshirol-acशिरोळvidhan sabhaविधानसभाRaju Shettyराजू शेट्टी